राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्रमक : हमीभावासाठी जिल्ह्याभर आंदोलने

By Admin | Updated: August 24, 2016 23:24 IST2016-08-24T23:23:13+5:302016-08-24T23:24:16+5:30

तहसीलवर कांदा फेको

Nationalist Congress aggressor: Movement across the district for the assassination | राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्रमक : हमीभावासाठी जिल्ह्याभर आंदोलने

राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्रमक : हमीभावासाठी जिल्ह्याभर आंदोलने

नाशिक : कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर कांदा फेको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्कदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे.

Web Title: Nationalist Congress aggressor: Movement across the district for the assassination