अपसंपदेच्या गुन्ह्यात जिल्हा परिषद अभियंत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:12 IST2018-07-03T16:10:34+5:302018-07-03T16:12:07+5:30
नाशिक : कर्तव्यावर असताना सतरा लाखांची अपसंपदा संपादीत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने नाशिक जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता जयवंत प्रल्हाद देशमुख (५६, रा. अंकिता अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ १९८६ ते २००९ या २३ वर्षांच्या कालावधीत देशमुख यांनी ही अपसंपदा संपादीत केल्याचे समोर आले आहे़

अपसंपदेच्या गुन्ह्यात जिल्हा परिषद अभियंत्यास अटक
नाशिक : कर्तव्यावर असताना सतरा लाखांची अपसंपदा संपादीत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने नाशिक जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता जयवंत प्रल्हाद देशमुख (५६, रा. अंकिता अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ १९८६ ते २००९ या २३ वर्षांच्या कालावधीत देशमुख यांनी ही अपसंपदा संपादीत केल्याचे समोर आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० मे १९८६ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत जयवंत देशमुख हे नाशिक जिल्हा परिषदेत शाखा अभियंता या पदावर काम करीत होते़ नोकरीच्या या कालावधीत त्यांनी १६ लाख ६७ हजार ४१५ रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचे समोर आले़ देशमुख यांच्याकडे उत्पन्नाच्या ज्ञान स्त्रोतापेक्षा जास्त असल्याचे चौकशीत आढळून आले़
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर कांबळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून देशमुख यांना अटक करण्यात आली आहे़