उपनगरला वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:55 IST2018-05-22T17:55:58+5:302018-05-22T17:55:58+5:30
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया दुचाकीस्वाराचे नाव आहे़

उपनगरला वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाकडून मारहाण
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया दुचाकीस्वाराचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक - पुणे महामार्गावरील उपनगर नाका सिग्नलवर सोमवारी पोलीस नाईक डी़एल़ शहाणे व पोलीस हवालदार मधुकर सोनवणे हे कर्तव्यावर होते़ दुपारी सव्वादोन ते अडीच वाजेच्या सुमारास संशतिय अरशद बस्तीवाल हा डबलशीट दुचाकीवर (एमएच ०१, एजी ८६२४) आला. रेड सिग्नल असतानाही त्याने सिग्नल तोडून वाहन भरधाव नेले. हवालदार सोनवणे यांनी बस्तीवाल यास सिग्नल तोडल्याबाबत हटकले असता त्याने सोनवणे यांची गच्ची धरून मारहाण केली़ यात नंबरप्लेट तुटली.
यानंतर संशयित बस्तीवाल याने हवालदार सोनवणे यांना ‘तुला कामाला लावतो’ असे म्हणून धमकी दिली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांत मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़