नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:31 IST2018-02-22T17:31:13+5:302018-02-22T17:31:22+5:30
नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात देवेंद्र शिर्के (६२, ईशावास्यम, पूर्णवाद नगर, प्रसाद मंगल कार्यालयाच्या मागे) राहतात़ शिर्के कुटुंबीय हे १३ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॅच व कुलूप लावलेला कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील २ लाख ७२ हजार सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये ६० ग्रम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा बांगड्या, ३०० ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे लोटे, १०० ग्रॅम चांदीचे ताम्हण व रोख रकमेचा समावेश आहे़ घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील व पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्यासह अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी शिर्के यांच्या फियादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घरफोडीची दुसरी घटना आनंदवली परिसरात घडली़ रेणुका रेसिडेन्सीमधील फ्लॅट नंबर ८ मधील रहिवसी पूजा राहुल पवार यांच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ९३ हजार सातशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ बुधवारी (दि़२१) सकाळी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़ तसेच घरातील तीन तोळे वजनाचे दोन सोन्याच्या वाट्या व साखळ्या असलेले मनी मंगळसूत्र, चांदीच्या तोरड्या, जोडवे चोरून नेले़ या प्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़