दुचाकीच्या धडकेत सिन्नरची महिला वारकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:59 IST2018-01-08T19:58:08+5:302018-01-08T19:59:55+5:30
नाशिक : सिन्नरहून त्र्यंबकेश्वरला जात असलेल्या दिंडीतील महिला वारक-याचा दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिन्नर येथे घडली़ अलका यशवंत पवार (४२, रा़ धोंडवीरनगर, पो़ मनेगाव, ता़सिन्नर, जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या वारक-याचे नाव आहे़

दुचाकीच्या धडकेत सिन्नरची महिला वारकरी ठार
नाशिक : सिन्नरहून त्र्यंबकेश्वरला जात असलेल्या दिंडीतील महिला वारक-याचा दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिन्नर येथे घडली़ अलका यशवंत पवार (४२, रा़ धोंडवीरनगर, पो़ मनेगाव, ता़सिन्नर, जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या वारक-याचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर येथून त्र्यंबकेश्वरला जाणा-या दिंडीमध्ये मनेगाव येथील अलका पवार या महिला वारकरी सामील झाल्या होत्या़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयाच्या पुढील उद्योगभवनसमोर भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली़ यामध्ये पवार यांचे हात, पाय, छाती व तोंडास जबर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी भाऊ बाजीराव यशवंत पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉग़डे यांनी तपासून मयत घोषीत केले़
दिंडीमध्ये सामील होऊन त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणा-या महिला वारकरी पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून दर्शनाची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे़