अल्पवयीन बालकावर हल्ला करणाऱ्या संशयितांची धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:47 IST2018-03-24T22:47:58+5:302018-03-24T22:47:58+5:30
नाशिक : अशोकस्तंभावरील गंजीबाबा मंदिराजवळ अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करणा-या संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ परिसरात दहशत निर्माण करणा-या या संशयितांची पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठ व त्यांच्या घराजवळील परिसरात धिंड काढली़

अल्पवयीन बालकावर हल्ला करणाऱ्या संशयितांची धिंड
नाशिक : अशोकस्तंभावरील गंजीबाबा मंदिराजवळ अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करणा-या संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ परिसरात दहशत निर्माण करणा-या या संशयितांची पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठ व त्यांच्या घराजवळील परिसरात धिंड काढली़
अशोकस्तंभ परिसरातील तांबट लेन परिसरातील अल्पवयीन मुलगा आदेश तांबट हा मंगळवारी (दि़२०) सायंकाळी परिसरातील गंजीबाबा मंदिराजवळ बसलेला असताना संशयित राकेश ऊर्फ पिंट्या साळुंखे, जय व विजय बैसाणे, अविनाश रंदवे, अश्पाक शेख व विकी कुटे (रा.सर्व मल्हारखान) तीन दुचाकींवर तिथे आले़ या संशयितांनी आदेशला जवळ बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार केल्यानंतर परिसरातील दुकाने व वाहनांवर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती़
या घटनेतील संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक करून वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि़२४) मल्हारखान, अशोकस्तंभ, मल्हार गेट पोलीस चौकी, तांबटलेन, गंगावाडी, रामवाडी, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड परिसरातून धिंड काढली़