रौलेटमध्ये हरलेले पैसे न दिल्याने नाशिकमधील तरुणाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:30 IST2018-04-29T18:30:51+5:302018-04-29T18:30:51+5:30
नाशिक : रौलेट जुगारासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने त्याच्या मित्रानेच आपल्या मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद पंचवटीतील सेवकराम सुबनामल दर्डा (४७, रा. क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) या पित्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित हर्षल सदाशिव गाडेकर (२८, रा. हिरावाडी रोड, पंचवटी) विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे़

रौलेटमध्ये हरलेले पैसे न दिल्याने नाशिकमधील तरुणाचे अपहरण
नाशिक : रौलेट जुगारासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने त्याच्या मित्रानेच आपल्या मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद पंचवटीतील सेवकराम सुबनामल दर्डा (४७, रा. क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) या पित्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित हर्षल सदाशिव गाडेकर (२८, रा. हिरावाडी रोड, पंचवटी) विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात सेवकराम दर्डा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा राहुल दर्डा याने संशयित हर्षल गाडेकर याच्याकडून रॉलेट जुगार खेळण्यासाठी ८० हजार रुपये घेतले होते़ गुरुवारी (दि़२६) सायंकाळी गाडेकर याच्या कॉलेजरोडवरील मॉस्को मेन्स वेअर या दुकानात राहुल गेला होता़ मात्र त्यानंतर मुलगा राहुल घरी न परतल्याने सेवकराम दर्डा यांनी संशयित गाडेकरकडे वारंवार विचारणा करूनही त्याने माहिती लपवून ठेवली़
रॉलेटसाठी घेतलेले पैसे न दिल्याने हर्षल गाडेकर याने आपला मुलगा राहुल याचे अपहरण केल्याची सेवकराम दर्डा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़