भद्रकालीतील अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:26 IST2018-06-30T23:25:17+5:302018-06-30T23:26:38+5:30

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik,police,Illegal,gutkha,Bhadrakali,raid | भद्रकालीतील अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा

भद्रकालीतील अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा

ठळक मुद्देगंजमाळ परिसरातील पंचशीलनगर ; पोलिसांनी छापा टाकून पकडला गुटखा

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गंजमाळ परिसरातील पंचशील नगरमध्ये प्रतिबंधीत गुटख्याचा मोठा साठा तसेच विक्री होत असल्याची माहिती नखाते यांना मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित महंमद शेख हा गुटख्याचा साठा व विक्री करताना आढळून आला़ त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी इंगळे व पाटील यांना बोलावून घेतले़ अन्न व औषध प्रशासनाने या मालाचा पंचनामा केला असता विमल, हिरा, रॉयल अशा विविध कंपन्यांचा एक लाख ६८ हजार रुपये किमतीचा गुटखा पानमसाला आढळून आला़ दरम्यान, पोलिसांनी हे गुदाम सिल केले आहे़

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, गुन्हे शाखेचे संदीप पवार, अनिल भालेराव तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली़

Web Title: nashik,police,Illegal,gutkha,Bhadrakali,raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.