एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:26 IST2018-05-21T17:26:09+5:302018-05-21T17:26:09+5:30

नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़

nashik,one,side,love,girl,acid,attack | एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

ठळक मुद्दे दीड वर्षांपासून पाठलाग

नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीचा संशयित सुश्मित भट हा गत दीड वर्षांपासून जेडीसी बिटको कॉलेज तसेच कॉलेज रोड परिसरात पाठलाग करीत होता़ मे महिन्यात पीडित तरुणीला गाठून संशयिताने प्रेमसंबंध ठेवण्याबाबत आग्रह केला़ मात्र, तिने नकार दिला असता संशयित भट याने अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला़ यानंतर तक्रार केल्यास कुटुंबीयांना मारण्याची तसेच चेहºयावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली़

या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित सुश्मित सुनील भट विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,one,side,love,girl,acid,attack