शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

गुराख्यामुळे टळला शाळकरी मुलीवरील अतिप्रसंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:37 IST

नाशिक : देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़ नागरिकांनी संशयित नामदेव रामचंद्र घोलप (५०, रा़चेहेडी नाका, ...

ठळक मुद्देदेवळाली कॅम्प साउथ एअरफोर्सघरी सोडण्याच्या बहाणापन्नास वर्षीय संशयित ताब्यात विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़ नागरिकांनी संशयित नामदेव रामचंद्र घोलप (५०, रा़चेहेडी नाका, साईदर्शन अपार्टमेंट फ्लॅट नंबर १०२, ता़जि़नाशिक) यास चोप देत पोलिसांच्या हवाली, तर मुलीला तिच्या आईच्या सुपूर्द केले़देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूर परिसरातील नऊ वर्षीय मुलगी देवळाली कॅम्पमधील कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकते़ दुपारी शाळा सुटल्यानंतर झेंडा चौकात रिक्षाची वाट पाहत असताना संशयित नामदेव घोलप (५०) हा दुचाकीवर आला़ त्याने मुलीला जवळ बोलावून घेत कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली असता तिने भगूरला जायचे आहे, असे सांगितले़ यानंतर मुलगी दुचाकीवर बसली असता तिला खंडेराव टेकडीमार्गे बार्न स्कूलरोडने साउथ एअरफोर्स रोडवर दुचाकी थांबवून जंगलाकडे येण्यास सांगितले़ या मुलीने मम्मीकडे जायचे असल्याचे सांगत जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली़ मुलीच्या ओरडण्याचा आवाज गुरे चरणाºया गुराख्याने ऐकला व धावत त्याने मुलीची सुटका करून दुचाकीची चावी काढून घेत संशयित घोलप यास चोप देण्यास सुरुवात केली़यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांपैकी एका महिलेने मुलीच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिल्यानंतर ती घटनास्थळी दाखल झाली़ तसेच तेथील अनिल जाधव व अंकित पार्सी यांनी नागरिकांची गर्दी पांगवत मुलीला व संशयित घोलप यास देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले़ याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़