महात्मानगरला भरधाव कार झाडावर आदळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:12 IST2018-01-10T16:12:09+5:302018-01-10T16:12:13+5:30
नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़९) मध्यरात्री महात्मानगर रोडवरील आयडीआय शोरूमसमोर घडली़ रंजीत भालचंद्र पाटील (५२, रा. भालचंद्र कॉलनी, फ्लॅट नंबर २३, कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे मयत कारचालकाचे नाव आहे़

महात्मानगरला भरधाव कार झाडावर आदळून चालक ठार
नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़९) मध्यरात्री महात्मानगर रोडवरील आयडीआय शोरूमसमोर घडली़ रंजीत भालचंद्र पाटील (५२, रा. भालचंद्र कॉलनी, फ्लॅट नंबर २३, कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे मयत कारचालकाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास रंजीत पाटील हे कारने (एमएच १८, व्ही १०३८) एबीबी सर्कलकडून जेहान सर्कलकडे भरधाव जात होते़ महात्मानगर रोड ने जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व ते पारिजातनगरमधील आयडीया शोरूमसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले़ यामध्ये त्यांची छाती व खुब्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़
या प्रकरणी पोलीस नाईक भिकाजी झनकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.