सावकारी व्याजाच्या तगाद्याने उपनगरमध्ये एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:31 IST2018-02-23T17:26:13+5:302018-02-23T17:31:27+5:30
नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी पंचवटी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सावकारी व्याजाच्या तगाद्याने उपनगरमध्ये एकाची आत्महत्या
नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी पंचवटी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संस्कृती सुर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकार मुरलीधर सूर्यवंशी (रा़ पंचवटी) व कल्पनाबाई खरे (पूर्ण नाव नाही, रा़म्हसरूळ) या दोघांकडून २०१३ मध्ये तीन लाख रुपये शेकडा दहा रुपये व्याजाने घेतले होते़ या रकमेचे पाच वर्षांत या रकमेचे झालेले अवाच्चे सव्वा रुपये वसुल करण्यासाठी चौधरी व खरे हे वाईट-साईट शिवीगाळ तसेच दमदाटी करून मारहाणही करीत होते़
या सततच्या त्रासाला कंटाळून वडील सुनील सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचे व त्यांना संबंधितांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी उपनगर पोलिसांनी सुनील सूर्यवंशी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौधरी व खरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
शहरात अवैध सावकारी
या प्रकरणामुळे शहरातील अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे़ पैशामुळे अडलेल्यांना नागरिकांची निकड लक्षात घेऊन त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे द्यायचे़ यानंतर वसुलीसाठी तगादा लावायचा, प्रसंगी मारहाणही करायची असे प्रकार सुरू आहेत़ कर्जाने पैसे वाटणाºयांकडे सावकारीचा परवाना आहे का याचा पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे़