शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

आर्ची-परशासाठी नाशिककर ‘सैराट’

By admin | Updated: May 16, 2016 08:56 IST

कार्यक्रम गुंडाळला : प्रेक्षकांची हुल्लडबाजी; पोलिसांचा सौम्य लाठीमार

नाशिक : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या आर्ची-परशाच्या ‘सैराट’ जोडीला बघण्यासाठी हजारो प्रेक्षकांची चोपडा बॅँक्वेट हॉलमध्ये आयोजित ‘फॅशन शो’ला प्रचंड गर्दी लोटली. दोन तासांनी आर्ची-परशाची जोडी व्यासपीठावर येताच जमलेल्या प्रेक्षकांचा ताबा सुटला अन् सर्वांनी सेल्फी घेण्यासाठी एकच धाव घेतल्याने सर्वत्र पळापळ होऊन सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याने अवघ्या काही सेकंदांतच आर्ची-परशाला व्यासपीठ सोडावे लागले.धन्वंतरी इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन अ‍ॅन्ड टेक्नोलॉजी संस्थेच्या वतीने ‘इंटरनल इलेजन्स’ या फॅशन-शोचे गंगापूररोडला आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर (परशा), अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) असल्याने हजारो नाशिककरांनी गर्दी केली होती. सहा वाजेपासून तरुणाईने कार्यक्रमस्थळाला वेढा घातला होता. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी बघता सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सात वाजता फॅ शन शो ला गोंधळातच प्रारंभ झाला. पासधारकांची हॉलमध्ये गर्दी वाढल्याने खासगी सुरक्षारक्षकांनी तातडीने मुख्य दरवाजा बंद केला. हॉलच्या प्रवेशद्वारावर पासधारक प्रेक्षकांची गर्दी लोटली. दरम्यान, प्रचंड गोंधळ झाल्याने पोलीस व सुरक्षारक्षकांनी गर्दीला बाहेर लोटण्याचा प्रयत्न केला. ‘सैराट’ झालेल्या प्रेक्षकांनी हॉलच्या खिडक्यांमधून उड्या मारत प्रवेश केला.पुढील अर्ध्या तासात फॅशन शो चे तीन राऊंड सादर झाले. साडेआठ वाजता ‘आर्ची-परशा’ जोडीचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थितांचा जीव सैराट झाला अन् गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळातच आर्ची-परशाने नाशिककरांना हात जोडून काही सेकं दांची झलक दिली. मात्र प्रेक्षक थेट व्यासपीठावर चढल्याने बंदोबस्तातच आर्ची-परशाला परतावे लागले.