शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

आदिवासी विकास विभागात एक कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:35 PM

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी नाशकातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात कैलास परशराम मोते (तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा वरिष्ठ अधिकारी कृषी विभाग) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्याविरूध्द गुन्हा: लाभाथ्यांची रक्कम परस्पर काढली

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी नाशकातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात कैलास परशराम मोते (तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा वरिष्ठ अधिकारी कृषी विभाग) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़

प्रमोद पाटील (काठेगल्ली, द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक अंतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयात १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधित प्रकल्प अधिकारी म्हणून कैलास मोते कर्तव्यावर होते़ या कालावधित मोते यांनी आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने शासनाच्या लघुउपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थ्यांकरीता पाइपांची खरेदी करून ९२ लाभार्थ्यांसाठी असलेल्या एकूण २,५७६ पाइपांच्या १३ लाख ६५ हजार २८० रुपयांच्या रकमेचा अपहार केला. तत्कालीन प्रकल्प अधिकारी मोते याने २००५ ते २००८ या कालावधीत तब्बल ७०० हून अधिक लाभार्थ्यांच्या हजारो पाइपांची खरेदी करून वेळोवेळी लाखो रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार करून फसवणूक केली. आतापर्यंत एक कोटी चार लाख ६४ हजार ७८० रुपयांपर्यंतची शासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे़

सद्य:स्थितीत कृषी विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले कैलास मोते यांच्या अटकेनंतर त्यांनी आणखी कुठे-कुठे फसवणूक व अपहार केला त्याची माहिती मिळणार आहे़ राज्यातील लाखो आदिवासी कुटुंबासाठी विविध शासकीय योजना राबविण्याचे काम आदिवासी विकास आयुक्तालय करते़ यासाठी या विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ मात्र आदिवासी विकास आयुक्तालयातील अधिकारीच लाभार्थ्यांच्या रकमेचा अपहार करीत असतील तर ख-या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कसा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़

टॅग्स :NashikनाशिकfraudधोकेबाजीPoliceपोलिस