शिक्षणाच्या नैराश्यातून अठरा वर्षीय तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 14:15 IST2018-04-04T14:14:09+5:302018-04-04T14:15:15+5:30
नाशिक : एफवायबीएचे शिक्षण घेत असतांना काही कारणास्तव शिक्षण सोडल्यानंतर सोबतच्या मैत्रिणी पुढे गेल्याच्या शल्यातून सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ कु. मयुरी सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा सोसायटी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

शिक्षणाच्या नैराश्यातून अठरा वर्षीय तरुणीची आत्महत्या
नाशिक : एफवायबीएचे शिक्षण घेत असतांना काही कारणास्तव शिक्षण सोडल्यानंतर सोबतच्या मैत्रिणी पुढे गेल्याच्या शल्यातून सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ कु. मयुरी सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा सोसायटी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी ही एफवायबीएचे शिक्षण घेत होती़ मात्र, काही कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडावे लागल्याने ती सध्या घरीच होती़ तिच्यासोबतच्या मैत्रिणी या नियमित महाविद्यालयात जाऊन आपले शिक्षण पूर्ण करीत होत्या़ आपण मागे राहिल्याचे शल्य मयुरीच्या मनात होते़ यामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजता घरातील बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषीत केले़
दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.