अडीच लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:42 IST2018-06-20T17:42:20+5:302018-06-20T17:42:20+5:30
नाशिक : मार्केटिंग दुकानात डिलिव्हरीबॉयचे काम करणाऱ्या संशयिताने पावणेतीन लाख रुपयांचे साहित्य चोरून त्याचा अपहार केल्याची घटना पंचवटीत घडली आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील पांडुरंग मुकेणे (२४, रा. हॉटेल रॉयल हेरिटेजजवळ, पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

अडीच लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार
नाशिक : मार्केटिंग दुकानात डिलिव्हरीबॉयचे काम करणाऱ्या संशयिताने पावणेतीन लाख रुपयांचे साहित्य चोरून त्याचा अपहार केल्याची घटना पंचवटीत घडली आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील पांडुरंग मुकेणे (२४, रा. हॉटेल रॉयल हेरिटेजजवळ, पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
पंचवटी पोलीस ठाण्यात रवि पारिख (किसान अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पंचवटीतील मालविय चौकात असलेल्या शारजा सोसायटीत प्रकाश मार्केटिंग हे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानात काही महिन्यांपासून संशयित सुनील मुकेणे हा डिलिव्हरीबॉय म्हणून कामास होता. जून २०१७ ते जून २०१८ या कालावधीत संशयित मुकेणे याने दुकानात काम करीत असताना तीन मिक्सर, दोन अॅम्प्लिफायर, पाच माईक, चार वायरचे बंडल असे २ लाख ७४ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य दुकानातून चोरून नेऊन अपहार केला. हा प्रकार पारिख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील मुकेणे यास अटक केली आहे.