कुरीअर सेवकाला मारहाण करून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:56 IST2018-05-23T17:56:40+5:302018-05-23T17:56:40+5:30
नाशिक : कुरीअर पोहोचविणाऱ्या अडवून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम व कुरीअरची पार्किटे बळजबरीने काढून घेतल्याचे घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़

कुरीअर सेवकाला मारहाण करून लूट
ठळक मुद्दे जबरी चोरीचा गुन्हा दाखल
नाशिक : कुरीअर पोहोचविणाऱ्या अडवून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम व कुरीअरची पार्किटे बळजबरीने काढून घेतल्याचे घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन्मेश दहीवाल हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समर्थनगर परिसरातून जात होते़ यावेळी तीन संशयितांपैकी एकाने दहीवाल यांच्यावर वीटकर फेकून त्यांना अडविले़ यानंतर महत्वाची कागदपत्रे, ३३ कुरीयर व ९५० रुपये रोख असा ऐवज या संशयितांनी बळजबरीने काढून घेतला़
या प्रकरणी दहीवाल यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़