शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा, संदर्भ रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून सोमवारी पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:31 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण तसेच विभागीय संदर्भ रुग्णालयातील बंद यंत्रसामग्रीची राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सोेमवारी (दि़ ११) पाहणी करणार आहेत़ विभागीय संदर्भ रुग्णालयातील नादुरुस्त यंत्रसामग्री त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेशही सावंत यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात शुक्रवारी (दि़ ८) पार पडलेल्या बैठकीत दिले आहेत़ संदर्भ रुग्णालयातील ...

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय अर्भक मृत्यू प्रकरणसंदर्भमधील यंत्रांच्या दुरुस्तीचे आदेश

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण तसेच विभागीय संदर्भ रुग्णालयातील बंद यंत्रसामग्रीची राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सोेमवारी (दि़ ११) पाहणी करणार आहेत़ विभागीय संदर्भ रुग्णालयातील नादुरुस्त यंत्रसामग्री त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेशही सावंत यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात शुक्रवारी (दि़ ८) पार पडलेल्या बैठकीत दिले आहेत़ संदर्भ रुग्णालयातील यंत्रणेबाबत आमदार जयवंत जाधव यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती़मंत्रालयात झालेल्या या बैठकीत आमदार जाधव यांनी संदर्भमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच चालू असून, त्यासाठी नेफ्रॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता झालेली नाही. तसेच डायलिसिससाठी प्रतिदिन २० रुग्णांची प्रतीक्षा यादी असते. डायलिसिस तीन सत्रात सुरू करण्यासाठी रुग्णालयास १० डायलिसिस यंत्र व डायलिसिस खुर्च्यांची तसेच आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता असून, देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्यामुळे रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा व लिफ्ट वर्षभरापासून बंद असल्याचे सांगितले़अमरावती येथील संदर्भसेवा रुग्णालयाप्रमाणे नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि पेडियाट्रिकसह इतर विकारांवरील विभाग सुरू करण्यासाठी आणखी दोन मजले वाढवून २०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रुग्णालयातील यंत्रणा व देखभाल दुरुस्तीच्या समस्येबरोबरच अतिविशेषोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी मंजूर आकृतिबंधाप्रमाणे ३६७ पदांपैकी ८० पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांचे हाल होतात़ तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी रुग्णांना तीन-तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असून, सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे बैठकीत सांगितले़संदर्भ रुग्णालयात आकृतिबंधाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात वैद्यकीय व सुश्रूषा संवगार्तील परिचारिकांची पदे नव्याने निर्माण करून सदर पदे भरण्याबाबत विभागीय उपसंचालकांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच विभागीय संदर्भसेवा रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे़ संदर्भसेवा रुग्णालयातील ६४ यंत्रापैकी २४ यंत्रे दुरुस्त करण्यात आली असून, पुढील १० दिवसांत इतर सर्व उपकरणे दुरुस्त केली जाणार आहेत़ याबरोबरच पुढील पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचा करार करण्यात आला असल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले़या बैठकीला प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीश पवार, सहसंचालक अर्चना पाटील, डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद घुटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, हिरामण खोसकर, संजय बनकर, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.