सिडकोत तडीपार गुन्हेगाराकडून तलवार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:48 IST2018-04-29T18:47:06+5:302018-04-29T18:48:16+5:30
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने सिडकोतील शिवशक्ती चौकात तलवार घेऊन दहशत माजविल्याची घटना शनिवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ राहुल धनराज बडगुजर (एन ४२, नवजीवन डे स्कूलजवळ, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़

सिडकोत तडीपार गुन्हेगाराकडून तलवार जप्त
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने सिडकोतील शिवशक्ती चौकात तलवार घेऊन दहशत माजविल्याची घटना शनिवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ राहुल धनराज बडगुजर (एन ४२, नवजीवन डे स्कूलजवळ, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़
सिडको परिसरातील गुन्हेगारी कारवायांमुळे सराईत गुन्हेगार राहुल बडगुजर यास परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी २२ जानेवारी २०१८ रोजी एक वर्षासाठी नाशिक शहर व ग्रामीणमधून हद्दपार केले होते़ या कालावधीत पूर्वपरवानगीशिवाय येणे गुन्हा असताना संशयित बडगुजर हा शनिवारी दुपारी शिवशक्ती चौकात तलवार घेऊन दहशत पसरवित होता़ अंबड पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी सापळा लावून संशयित बडगुजर यास ताब्यात घेत त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़
पोलिसांनी तडीपार बडगुजरकडून २०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे़