Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार-रविवारी 'या' ५ विभागांत पाणी पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:53 IST2026-04-02T14:53:31+5:302026-04-02T14:53:31+5:30

Nashik Water Supply Cut: नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहण्याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. ...

Nashik Water Supply Cut Repair work by Nashik Municipal Corporation; Water supply affected in all five divisions on April 4 and 5 | Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार-रविवारी 'या' ५ विभागांत पाणी पुरवठा बंद

Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार-रविवारी 'या' ५ विभागांत पाणी पुरवठा बंद

Nashik Water Supply Cut: नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहण्याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. शहरातील विविध जलवाहिन्यांची दुरुस्ती, गळती रोखणे आणि नवीन जलकुंभांच्या जोडणीसाठी पालिकेने नियोजित दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे नाशिक पूर्व, नाशिक रोड, पंचवटी, सातपूर आणि सिडको या पाचही विभागांतील पाणी पुरवठा ठराविक कालावधीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नाशिककरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिक पूर्व विभाग (कामांसाठी अंदाजे वेळ १२ तास)

१) नाशिक पूर्व प्र.क्र. ३० मधील कलानगर जलकुंभ भरणारी ५०० मिमी. व्यासाची गुरुत्व वाहिनी मुख्य ७०० मिमी. व्यासाच्या गुरुत्व वाहिनीला जोडणे.

२) गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र

३) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठ्या प्रमाणत असलेले ३०० मिमी. व्यासाच्या पाइपलाइन लिकेजचे काम बंद करणे .

४) पी ॲंड टी कॉलनी येथे २०० मिमी. व्यासाचा एअर व्हॉल बदलणे.

----------------------

नाशिक रोड विभाग (कामांसाठी अंदाजे वेळ ३६ तास)

१) नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर ९०० मिमी. एम. लाइनचे क्रॉस कनेक्शन करणे.

२) गांधीनगर जलशुद्धीकरण येथे रॉ वॉटर ९०० मिमी. लाइन १२०० मिमी. पाइपलाइनवर क्रॉस कनेक्शन करणे.

३) गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट ७०० मिमी. व्यासाच्या पाइपलाइनवर ४५० मिमी. व्यासाच्या पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शन करणे, तसेच सदर ७०० मिमी व्यासाच्या पंपाच्या पाइपलाइनवर स्मार्ट सिटीमार्फत फ्लो मिटर बसविणे.

--------------

पंचवटी विभाग (कामांसाठी अंदाजे वेळ १८ तास)

१) पेठरोड सप्तरंग बिल्डींगजवळ मखमलाबाद येथील उर्ध्ववाहिनीवर ६०० मिमी. X ६०० मिमी. व्यासाचे तवली डोंगर उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे.

२) पेठरोड आर.टी.ओ ऑफीससमोर समर्थ नगर नवीन जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीचे करणे ६०० मिमी. X ६०० मिमी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन.

३) प्रभाग क्र. ०६ कुसुमाग्रज गार्डन येथे गुरुत्व वाहिनीवरील लिकेज बंद करणे.

-----------

सातपूर विभाग (कामांसाठी अंदाजे वेळ १२ तास)

१) १२०० मिमी. व्यासाची पी.एस.सी. कडेपठार अनुविषांत अपार्टमेंट जवळ पाइपलाइन गळती बंद करणे.

२) महेंद्र मटेरीअल गेट समोर १२०० मिमी. व्यासाची पी.एस.सी. पाइपलाइन गळती बंद करणे.

३) बळवंत नगर जलकुंभाजवळ ओमकार तिरुमाला बिल्डींग समोरील १२०० मिमी. व्यासाची पी.एस.सी. पाइपलाइन गळती बंद करणे.

४) कॅनल लगत पाटील फार्म हाऊससमोर १२०० मिमी. व्यासाची पी.एस.सी. पाइपलाइन गळती बंद करणे.

५) कार्बन नाका टपरी झोनजवळ भिंतीलगत ५०० मिमी. व्यासाची पी.एस.सी. पाइपलाइन गळती बंद करणे.

------------------

सिडको विभाग (कामांसाठी अंदाजे वेळ १८ तास)

१) प्र.क्र.२७ महाराजा हॉटल येथील १००० मिमी. पीएससी लाइनचे लीकेज बंद करणे.

२) प्र. क्र. २७ मधील पाथरडी फाटा वरील ३ नं टाकीवर आउटलेट वाॅल्व्ह टाकणे.

३) प्र. क्र. २५ मधील इंद्रनगरी जलकुंभ येथे क्रॉस कनेक्शन करून ४५० मिमी. व्यासाचा वाॅल्व्ह टाकणे.

४) प्र. क्र. २४ मधील लेखानगर स्टेट बँकेच्या मागे टाकी भरण्याच्या साडेचारशे मिमी. व्यासाची पाइपलाइन लीकेज काढणे.

५) प्र. क्र. २४ गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक पीएससी लाइनवरील लीकेज काढणे.

६) प्र. क्र. २४ गोविंद नगर बोगद्याजवळील ६०० मिमी. व्यासाची टाकी भरण्याची मेन पाइपलाइन लीकेज काढणे.

७) प्र. क्र. ३१ मधील भवानी माता-२ टाकी भरण्याची पाइपलाइनवरील लीकेज काढणे.

८) प्र. क्र. २५ मधील रायझिंग मेन लाइन व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे.

९) प्र. क्र. २७ मधील मारुती संकुल पम्प येथे एनआरवी वॉल्व्हचे लीकेज काढणे.

नाशिक महानगरपालिकेने हाती घेतलेली ही कामे शहराच्या भविष्यातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पाणी पुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा. काम पूर्ण झाल्यानंतरही काही वेळ पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने पालिकेला सहकार्य करावे.

 

 

Web Title : नाशिक में पानी की कटौती: इन 5 क्षेत्रों में जलापूर्ति बाधित

Web Summary : आवश्यक पाइपलाइन मरम्मत के कारण नाशिक पूर्व, नाशिक रोड, पंचवटी, सातपुर और सिडको में इस सप्ताह के अंत में नाशिक में पानी की आपूर्ति बाधित रहेगी। निवासियों को पानी का भंडारण करने और नगर पालिका के साथ सहयोग करने की सलाह दी जाती है।

Web Title : Nashik Water Cut: 5 areas face supply disruption this weekend

Web Summary : Nashik faces water supply disruptions this weekend in Nashik East, Nashik Road, Panchavati, Satpur, and Cidco due to essential pipeline repairs. Residents are advised to store water and cooperate with the municipality.