शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोन तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 00:28 IST

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

नाशिक : नाशिकमध्ये वाडीवऱ्हे, पंचवटी शिवारात झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरटीओ कार्यालयाकडून फुलेनगर कडे जात असताना ऍक्टिवा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पेठफाटा येथे भरधाव दुचाकी शुक्रवारी (दि.26) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी अरुण यशवंत शार्दुल (२० रा. फुलेनगर) याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याचे दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून प्रथम उपचार करून तत्काळ रात्री खासगी रुग्णालयात खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सुरज अंतोष जाधव (१८रा. फुलेनगर) याच्यासह त्याच्या एका मित्राचा समावेश आहे.दुसऱ्या घटनेत पाथर्डी फाटा ज्ञानेश्वर नगर येथील शिक्षक शरद काशिनाथ पागेरे (४०) हे वाडीवऱ्हे येथुन पुतणीचा विवाह आटोपून आपल्या पत्नी व लहान मुलासमवेत घरी परतत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत ते व पत्नी, मुलगा रस्त्यावर कोसळले, सुदैवाने पत्नी व मुलाला किरकोळ मार लागला. मात्र पागेरे यांना जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता पागेरे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ते अभिनव बाळ विकास मंदिर, सिडको येथील संगीत शिक्षक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण,  भावजय असा परिवार आहे. पत्नी व दीड वर्षांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू