मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:46 IST2026-04-10T13:44:55+5:302026-04-10T13:46:03+5:30

Nashik IT Firm News: नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik: Sexual Exploitation and Forced Conversion Racket Busted in IT Firm; 4 Arrested | मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!

AI Image

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने आणि धाडसाने कारवाई करत मुख्य संशयितांसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह ७ महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने वेशांतर करून कंपनीत प्रवेश केला. संशयित आरोपी मिटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करायचे. पोलिसांनी हे वर्तन प्रत्यक्ष रंगेहात पकडले आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

तपासात धक्कादायक प्रकार उघड

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केले जायचे. "माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली आहे," असे सांगून पीडित महिलांवर दबाव टाकला जात असे. एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला सुट्टीच्या दिवशी एका रिसोर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. केवळ महिलाच नव्हे, तर एका पुरुष कर्मचाऱ्यालाही धर्मांतरासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

डिजिटल पुराव्यांचा आधार

पोलिसांनी या कारवाईदरम्यान कंपनीतील ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले आहे. डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी ही ठोस कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसिफ अन्सारी शफी शेख, शाहरूख कुरेशी रजा मेमन आणि तौफीक अत्तार यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीची एचआर अश्विनी चेनानी हिला देखील या गुन्ह्यात सामील असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title : आईटी कंपनी के काले कारनामे उजागर: यौन शोषण और जबरन धर्मांतरण

Web Summary : नाशिक की आईटी कंपनी में घोटाला: महिलाओं का यौन शोषण, धर्मांतरण का दबाव। पुलिस ने चार को गिरफ्तार किया, सीसीटीवी फुटेज जब्त किया। पीड़ितों को नौकरी के साक्षात्कार से निशाना बनाया गया। एक महिला एचआर कर्मचारी भी गिरफ्तार।

Web Title : IT Company's Dark Deeds Exposed: Sexual Exploitation and Forced Conversions

Web Summary : Nashik IT company scandal: Women sexually exploited, pressured for conversion. Police arrested four, seized CCTV footage. Victims were targeted from job interviews. A female HR employee is also arrested.