Nashik: फायटर, चाकू, कंडोम आणि...; विद्यार्थ्यांचे दप्तर उघडताच शिक्षक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:32 IST2025-04-08T17:31:01+5:302025-04-08T17:32:00+5:30

नाशिकमधील शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क चाकू, कंडोमची पाकिटे आणि अंमली पदार्थ सापडल्याने शिक्षकांसह पालकांनाही मोठा धक्का बसला आहे.

Nashik School Students Caught With Drugs Chains and Condoms in Bags | Nashik: फायटर, चाकू, कंडोम आणि...; विद्यार्थ्यांचे दप्तर उघडताच शिक्षक हादरले

Nashik: फायटर, चाकू, कंडोम आणि...; विद्यार्थ्यांचे दप्तर उघडताच शिक्षक हादरले

अश्वजीत जगताप-

Nashik Crime: नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील एका खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, पत्त्याचे कॅट, कंडोम आणि सायकलची चेन सापडल्याने शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांनाही मोठा धक्का बसला. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज देण्यात आली. परंतु, शालेय मुलांच्या दप्तरात अशा वस्तू सापडल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी या शाळेत चित्र विचित्र हेअरस्टाईल आणि हिरोगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस शाळेतच कापण्यात आले होते. त्यानंतर शिक्षकांनी अचानक इयत्ता आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले. दप्तरात फायटर, चाकू  ,पत्त्याचे कॅट, कंडोम आणि सायकलची चेन सापडल्याने शिक्षकांना मोठा धक्का बसला.

यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून हा संपूर्ण प्रकार सांगितला. मुलांच्या दप्तरात अशा काही वस्तू सापडतील, अशी पालकांनी कल्पनाही केली नव्हती.शिक्षकांच्या जागरूकतेने हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढेही ही तपासणी अशीच चालू राहणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

Web Title: Nashik School Students Caught With Drugs Chains and Condoms in Bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.