शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक सातपूर येथील गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ सीमेवरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:40 IST

नाशिक क्राइम ब्रँच युनिट २ च्या पथकाची कारवाई

नाशिक: सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँच युनिट २ च्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ बॉर्डरजवळ ही महत्त्वाची कारवाई केली आहे. नाशिकच्या गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथक रवाना केली होती.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत ठिकाण बदलत होते. ते राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिक पोलिस पथक हे शोध घेत असताना पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच, भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले. तरी या संशयितांनी येथून पळ काढत नेपाळ बॉर्डर आश्रय घेतला होता. या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते. मात्र, नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हीचा योग्य वापर करत त्यांचा माग काढला. अखेर नेपाळ बॉर्डरजवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.  

सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गजाआड झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोंढे टोळी ही सक्रीय होती. सातपूर निखिल गोळीबार प्रकरणाच्या टोळीचे नाव आल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा बीमोड करण्यासाठी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील लोंढे टोळीतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर नाशिक पोलिसांनी त्यांना नेपाळ भारत बॉर्डरजवळून अटक केली आहे. लवकरच त्यांना नाशिक येथे आणण्यात येणार असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Shootout: Key Accused Bhushan Londhe Arrested Near Nepal Border

Web Summary : Bhushan Londhe, prime suspect in the Satpur shooting case, and accomplice Prince Singh were arrested near the Nepal border. Nashik police had launched a massive manhunt, leading to their capture after a chase across multiple states.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी