शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:09 IST

नगरसेवकांना घेऊन वायनरीतून बस निघाल्या आणि त्या गेट बाहेर निघाल्या असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी बस थांबवल्या. बसमध्ये जाऊन त्यांनी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलून शिंदेसेनेला उमेदवारी दिली जाईल असे सांगितले.

नाशिक : महापौरपदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र यांची उमेदवारी घोषित झालेली, गटनेते शाम बडोदे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.५) रात्री कॅम्पमध्ये व्हिप बजावलेला, सकाळी दहा वाजेच्या सुमारास सहलीवरील नगरसेवकांच्या बस भरल्या आणि ते निघाले तोच भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोटारी थांबवल्या, उपमहापौरपद शिंदेसेनेला जाणार असल्याचा निरोप दिला आणि नाट्यमय कलाटणी मिळाली.

सर्वांना सभागृहात पोहोचताना विलास शिंदे यांना उमेदवारी घोषित केल्याचे कळले. नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक अंतिम क्षणी उपमहापौरपदाच्या नाट्यमय घडामोडींनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाशिकमध्ये सत्तेतील सहभागाबाबत चर्चा सुरू होत्या. शिंदेसेनेने महापौरपदावर नसला तरी उपमहापौरपदासाठी दावा सांगून विलास शिंदे, प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल करून ठेवले होते.

भाजपचे सर्व नगरसेवक गुरुवारी सायंकाळी भाजपच्या नगरसेवकांना पक्षाचे गटनेते अॅड. शाम बडोदे यांनी हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि.६) सकाळी शिंदेसेनेला सत्तेच्या सोबत घेण्याचा निर्णय झाल्याची चर्चा सुरू झाली. सकाळी नगरसेवकांना घेऊन वायनरीतून बस निघाल्या आणि त्या गेट बाहेर निघाल्या असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी बस थांबवल्या. बसमध्ये जाऊन त्यांनी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलून शिंदेसेनेला उमेदवारी दिली जाईल असे सांगितले. अर्थात, सभागृहात पोहोचल्यानंतर नगरसेवकांना विलास शिंदे हे उमेदवार असतील असे कळले.

शहराच्या विकासासाठी १०० दिवस दौरा - आडके

शहराच्या विकासासाठी १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक प्रभागात त्या परिसरातील आमदार, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांना बरोबर घेऊन पाहणी करून, तेथील समस्या जाणून घेणार असल्याची माहिती पहिल्याच पत्रकार परिषदेत महापौर हिमगौरी आडके यांनी दिली. यावेळी आडके म्हणाल्या, कुंभमेळ्यासाठी सर्वजण एकत्रित काम करणार आहे. शहराच्या विकासाबरोबरच कुंभमेळाही यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आपल्यासमोर महत्त्वाचे काम आहे. 

नाशिक ही पुण्यनगरी आहे. मला ही संधी नसून सेवेची पर्वणी मिळाली आहे. प्रत्येक घरात राम पोहोचवायचा आहे. त्यात नाशिककरांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कामातून ताकद, निष्ठा व विकास घडवायचा आहे. विरोधी नेत्यांनाही हीच अपेक्षा आहे. प्रभाग निधीबरोबरच शासनाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील.

शहराचा मजबूत पाया तयार करू - विलास शिंदे

कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता शहराचा जास्तीत जास्त विकास करायचा आहे. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपमहापौरपदासाठी दिलेली संधी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. या संधीचे नक्कीच सोने करून दाखवीन, असा विश्वास उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, तसेच भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. 

कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा केवळ तात्पुरता नव्हे, तर दीर्घकालीन विकास साधण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. कुंभमेळ्यामुळे शहराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार असून, या संधीचा उपयोग शहराच्या भविष्याचा मजबूत पाया घालण्यासाठी केला जाईल. या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करून दाखवेन, असा ठाम विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Deputy Mayor Changed: Mahajan Stopped Bus, BJP's Strategy with Shinde Sena

Web Summary : Girish Mahajan halted corporators' bus, announcing the Deputy Mayor post for Shinde Sena. This last-minute switch occurred amidst discussions between Fadnavis and Shinde regarding power-sharing in Nashik, prioritizing Shinde's faction for the position.
टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे