नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात झालेल्या गोंधळामुळे निवडणुकांत फटका बसू नये यासाठी भाजपश्रेष्ठींनी कंबर कसली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी झाल्या प्रकाराचे पाप माझ्या माथी मारा, परंतु निवडणुकीत दगाबाजी करू नका, असे आर्जव करीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमधील नेते, कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा लॉन्स येथे रविवारी (दि. ४) भाजपचा विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आर्दीसह पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी तिकीट वाटपात झालेल्या गोंधळावर भाष्य केले. जे काही झाले, ती चूक माझी होती. त्यामुळे त्या सर्व चुकांची जबाबदारी माझ्यावर टाका. परंतु निवडणुकीत दुफळी ठेवू नका. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगत त्यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली.
तिकीट वाटपाचा घोटाळा झाल्यानंतर तीन आमदार आणि महाजन हे एका व्यासपीठावर आले नव्हते. त्यातच पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाकडे देखील आमदारांनी पाठ फिरविली होती. परंतु या कार्यक्रमा तीनही आमदार आणि ज्यांच्य विरोधासाठी या आमदारांनी नाराज व्यक्त केली, ते सर्व उपस्थित होते.
गिरीश महाजन यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मागणी होती. परं जागा फक्त १२२ होत्या. निवड करतान काही निकष लावले गेले आणि त्या निकषांवर उमेदवारी दिली गेली आहे महाजन यांच्या आधी आमदार सीमा हि आणि आमदार राहुल ढिकले यांनी य निर्धार मेळाव्याला संबोधित केल त्यामध्ये होत असलेले आरोप चुकी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रस्ताविक सुनील केदार यांनी केले. सूत्रसंचालन सुनील देसाई यांनी केले.
मेळाव्याला नवे नेतेही उपस्थित....
पंचवटीत झालेल्या या मेळाव्याला तीनही आमदार उपस्थित होते. मुख्य म्हणजे ज्या इच्छुकांना विरोध करण्यासाठी या आमदारांनी विरोध केला होता ते सर्व इच्छुक या मेळाव्याला उपस्थित होते. आता ते पक्षाच्या प्रवाहात आल्यानंतर विरोधाचा जोर किती टिकणार अशी चर्चाही यावेळी होत होती.
Web Summary : Ravindra Chavan urged party workers to unite for the Nashik municipal elections, taking responsibility for ticket allocation errors and appealing for no internal sabotage. Leaders emphasized unity despite earlier disagreements.
Web Summary : रवींद्र चव्हाण ने नासिक नगर निगम चुनाव के लिए पार्टी कार्यकर्ताओं से एकजुट होने का आग्रह किया, टिकट आवंटन त्रुटियों की जिम्मेदारी ली और आंतरिक तोड़फोड़ न करने की अपील की। नेताओं ने पिछली असहमति के बावजूद एकता पर जोर दिया।