विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आलेल्या आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर याच्यात काटाकाटीचे राजकारण सुरुच असून भाजपत दाखल झाल्यानंतर त्याचा फटका पक्षाला बसला आहे. सिडको विभागात चार अधिकृत उमेदवारांचे अर्ज अगोदर अन्य कार्यकर्त्यांना दिलेले वैध ठरवण्यात आले. त्यामुळे माजी नगरसेवक मुकेश शहाने आणि भाग्यश्री डोमसे यांना अपक्ष निवडणूक लढण्याची नामुष्की झाली आहे. विशेष म्हणजे तबल अर्जाचा मोळ बडगुजर यांच्या पायावर पडला असून प्रभाग २९ मध्ये त्यांचे पुत्र दीपक बडगुजर तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये सुधाकर बडगुजर आणि त्यांची पत्नी हर्षा बडगुजर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन उमेदवार भाजपकडून लढण्याची ही पहिलीच पटना ठरली आहे.
पक्षातील हा वाद आता श्रेष्ठीपर्यंत गेला असून या प्रकाराची तातडीने चौकशी करून अहवाल मागवण्यात आला आहे. मंगळवारी (दि.३०) मुंबई महामार्गावरील एका फार्म हाऊसमध्ये बद्वगुजर यांनी एबी फॉर्म ताब्यात घेऊन त्या माध्यमातून अनेकांना उमेदवारी दिल्याचा आरोप हिरे यांच्याकडून झाला होता. फार्म हाउसवरील वादानंतर एकाच प्रभागात एकाच जागेसाठी दोन दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात आले. त्याच वेळी भाजपातील संबंधितांचे अर्ज बाद करण्याची खेळी यशस्वी होणार असल्याची चर्चा होती. छाननीत सिडकोत मुकेश शहाणे आणि भाग्यश्री ढोमसे बोचे अर्ज बाद झाल्याने भाजपात एकमेकाचे उमेदवार बाद करण्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेऊन, असे सांगणान्या मुकेश शहाणे यांनी अपक्ष उमेदवारीचा इशारा दिला आहे.
भाजप शहराध्यक्षांना नाराजांनी धरले धारेवर
या प्रकरणामुळे नाराज झालेल्या भाग्यश्री डोसने व रबी पारील सांत्री भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार याच्या साब्दिक चकमक झाली. संगीता पाटील यांचे पती पाटील यांनी "खानदेशी कार्यकत्यांवर अन्याय होत असून तो सहन केला जाणार नाही." असा आरोप करत जाब विचारला निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून. आयाराम गयारामांना उमेदवारी दिल्याचा आरोपही केला.
२०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत एबी फॉर्म वाटपाचे धोळ झाले होते. अशा पक्षातील काही नेते आता भाजपत दाखल झाले आहे. आणि त्यांनी उमेदवारी अर्जे म्हणजेच एबी फॉर्मचा घोळ घालण्याची परंपरा सुरु केली आहे. त्यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. मात्र, भाजप हा शिस्तीबद्ध पक्ष आहे. या सर्व प्रकरणाची पक्षाची नेते योग्य ती दखल घेतील, अशी खात्री वाटते.
सीमा हिरे, आमदार
प्रभाग क्रमांक २९ मध्ये पक्षाने दीपक बडगुजर यांना उमेदवारी दिली होती. नंतर २५ मधून निवडणूक लहण्यास सांगितले. परंतु अगोदर त्यांचा अर्ज दाखल झाला होता. अशाच प्रकारे माझ्या प्रभागातही मी दीपक आणि अन्य दोन उमेदवार निश्चित कुराले होते. त्यानंतर पक्षाने उमेदवार बदलून दिले. परंतु अगोदर एबी फॉर्म दाखल झाले होते. मी पक्षात नवीन आहे, पक्षाच्या आदेशाप्रमाणे एबी फॉर्म दिले होते. दीपक बडगुजर पहिल्यापासूनच प्रभाग २२ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. आता पक्ष सांगेल त्यानुसार उमेदवारी करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
सुधाकर बडगुजर, भाजप नेते
निवडणूकीसाठी ज्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाल्यानंतर प्रथम सादर केला जातो. तो वैध मानला जातो. नंतर दुसऱ्या कोणा उमेदवारांनी अर्ज सादर केला तरी तो वैध मानला जात नाही, अशा दुसऱ्या उमेदवाराचे एबी फार्म अवैध ठरला तरी तो उमेदवार बाद होत नाही, फक्त त्याला त्या पक्षाचे चिन्ह मिळत नाही. ती अपक्ष उमेदवार म्हणून लादू शकतो.
अविनाश भिडे, ज्येष्ठ विधिज्ञ
भाजपने २०८ उमेदवाराचे एबी फॉर्म व्यवस्थित वितरीत केले आहेत. उर्वरित अर्ज वाटप करताना आमदार सीमा हिरे व सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकामध्ये बाचाबाची झाली. यावेळी गड़बड़ गोंधळात काही सह्या केलेले एबी फॉर्म गहाळ झाले. त्यामुळे काही लिहाणी दोघा इच्छुकांनी एबी फॉर्म जोडले आहेत. या घडलेल्या सर्व प्रकाराचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना पाठविला आहे.
सुनील केदार, गहराध्यक्ष, भाजप
प्रभाग क्रमांक २४ अ मध्ये भाजपने पल्लवी राहून गणोरे आणि सुरेखा नेरकर या दोन उमेदवारांन एबी फॉर्म दिले होते. परंतु, छाननौमध्ये केवळ चार मिनिटे अगोदर फॉर्म जमा केल्याने पल्लवी गणोरे यांचा अर्ज वैध करविण्यात आला, तर नेरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. असे असले तरी नेरकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.
प्रभाग क्रमांक ३० मध्ये उद्धवसेनेच्या वतीने प्रथम निशांत जाधव यांनी सादर केलेला एबी फॉर्म संलग्न असलेला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकान्यांनी ग्राह्य धरला. दरम्यान, शिंदेसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले नीलेश साळुंखे यांनी उद्धवसेनेकडून दुसरा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, एची फॉर्म आधीच सादर झाल्याने साळुंखे यांचा अर्ज अपक्ष म्हणून घोषित करण्यात आला.
प्रभाग १८ व गटात शिंदेसेनेकडून माजी नगरसेविका रंजना बोराळे, शीतल शिवाजी ताकाटे या दोघांना एची फॉर्म देण्यात आले होते. मात्र, बोराडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शीतल ताकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. यामुळे बोराडे यांचा शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरला असून, ताकाटे यांचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे.
Web Summary : Infighting in BJP over AB forms leads to multiple candidates from the Badgujar family securing nominations. This sparks outrage, forcing some to contest independently and prompting an internal inquiry into the controversy.
Web Summary : एबी फॉर्म को लेकर बीजेपी में अंदरूनी कलह, बडगुजर परिवार के कई सदस्यों को नामांकन। इससे आक्रोश फैल गया, कुछ स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने के लिए मजबूर हो गए, और विवाद की आंतरिक जांच शुरू हो गई।