Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 20:11 IST2025-08-08T20:10:20+5:302025-08-08T20:11:48+5:30

Nashik Husband wife Crime: नाशिकमध्ये पती-पत्नीने एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Nashik: Husband and wife end their lives by jumping in front of an express train, after 11 years of marriage... | Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

नाशिकमधील घोटी शहरालगत असलेल्या रेल्वे लाईनवर दाम्पत्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा होऊ शकला नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिनेश देवीदास सावंत (३८) व भाग्यश्री सावंत (३३) रा सुधानगर, घोटी अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी प्रचीतराय बाबा मंदिर ते घोटी रेल्वे गेट दरम्यान या दाम्पत्याने इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसखाली आत्महत्या केली. 

घोटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास निरीक्षक विजय शिंद, सहा. उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, हवालदार मारोती बोऱ्हाडे करीत आहेत. दिनेश हेही इगतपुरी महिंद्रा कंपनीत नोकरीस होते. 

मूल नसल्याने टोकाचा निर्णय ?

दिनेश सावंत व भाग्यश्री सावंत यांचा विवाह सन २०१३मध्ये झाला होता. लग्नाला ११ वर्षे होऊनही त्यांना मूलबाळ नव्हते. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांच्या या टोकाच्च्या निर्णयाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Nashik: Husband and wife end their lives by jumping in front of an express train, after 11 years of marriage...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.