शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अखेर भंगार बाजारावर हातोडा पडण्यास सुरुवात

By admin | Updated: January 7, 2017 09:44 IST

अखेर नाशिक शहरातील बेकायदा भंगार बाजार हटविण्यास आज सकाळी सुरुवात झाली आहे

गोकुळ सोनवणे/ नरेंद्र दंडगव्हाळ /ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 7 - अखेर नाशिक शहरातील बेकायदा भंगार बाजार हटविण्यास आज सकाळी सुरुवात झाली आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा कारवाईत समावेश आहे. एकाच भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्याची ही पहिलीच वेळ आहे
नाशिक शहरातील सातपूर अंबड लिंक रोडवर गेल्या 17 वर्षापासून हा बाजार वसला होता. परप्रांतियांनी कब्जा केलेला हा बाजार नागरी वसाहतीत असून त्यात एक हजाराहून अधिक भंगार दुकाने आहेत. या बाजारात भंगार जळण्यामुळे प्रदूषण होते, शिवाय चोरीच्या वस्तू विक्री तसेच अन्य कारणामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेने हा बाजार हटविण्यासाठी तयारी केल्यानंतर व्यवसायिकांनी आधी उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तेथे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यानंतर राजकीय दबावामुळे आजवर हा बाजार हटविला जात नव्हता. आता महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी मनावर घेतल्याने भंगार बाजारावर हातोडा पडणार हे अटळ झाले. काल पोलिसांनी या भागातून संचालन केल्यानंतर कारवाई होणारच अशी खात्री पटल्याने रात्री व्यवसायिकांनी बाजारातील सर्व साहित्य हलविले, त्यामुळे भंगार बाजारात आज सकाळ पासून शुकशुकाट आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बाजार हटवण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेने या कारवाई साठी सहा पथके तयार केली असून ही कारवाई आठवडाभर चालणार आहे.