शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

Nashik: वाजे, गोडसे, भगरेंसह शांतिगिरींना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, ४८ तासांत खुलाशाचे आदेश

By संकेत शुक्ला | Published: May 07, 2024 2:03 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणार असून हा प्रचार त्वरित थांबविण्यासह ४८ तासांत त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावल्याने खळबळ उडाली आहे.

- संकेत शुक्लनाशिक -  निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणार असून हा प्रचार त्वरित थांबविण्यासह ४८ तासांत त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासह खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारचे निरीक्षक कार्यरत असून प्रत्येक प्रकारच्या प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. असे असतानाही महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी परवानगी न घेताच प्रचार सुरू केल्याने हे प्रकरण त्यांना भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावरील प्रचार तातडीने थांबवण्याचे आदेश देत ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश नोटिसीद्वारे बजावले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरणलोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणीकरण समितीची (एमसीएमसी) परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, सोशल मीडियावर विनापरवानगी प्रचार होत असल्याचे माध्यम मॉनिटरिंग विभागाच्या निदर्शनास आले आहे. यानंतर या उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसमुळे उमेदवारांचीही यामुळे डोकेदुखी वाढणार आहे. एमसीएमसी विभागाची परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात संबंधित उमेदवारांना नोटीस बजावली असून, त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.-जलज शर्मा, जिल्हाधिकारी संबंधित उमेदवाराने रीतसर परवानगी घ्यावी. परवानगीनंतरच त्यांना सोशल मीडियावर प्रचार करता येईल. सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही त्यांनी व्हिडीओ हटवले नाही तर उमेदवाराच्या माध्यम प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्यात येईल.- बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी)

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग