शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक चिंब

By admin | Updated: July 10, 2016 23:35 IST

गोदावरीला पूर : नदीकाठच्या गावांना ‘हाय अलर्ट’; दारणा, बाणगंगा, म्हाळुंगी नद्यांना पूर

 नाशिक : दोन वर्षांनंतर नाशिककरांनी प्रथमच रविवारी (दि.१०) दुपारी गोदावरीचा पूर अनुभवला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने रविवारी पहाटे जोर धरल्यामुळे गोदावरीचा जलस्तर उंचावला. पूरनियंत्रण व जिल्हा आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून शहरात पावसाची संततधार सुरू असून, शनिवारी दुपारपासून पाण्याचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढला आहे. रविवारी पहाटेपासून दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पुलाखाली असलेल्या मोजपट्टीवरील १८४८ मीटरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली होती. त्यामुळे नदीपात्रातून दुपारी तीन वाजेनंतर सुमारे १४ हजार क्यूसेक पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याची माहिती पूरनियंत्रण विभागाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुपारी एक वाजेपासूनच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीच्या पाण्याची पातळी दुपारच्या सुमारास अचानकपणे वाढल्याने गोदाघाटावरील टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच गोदावरी काठालगत असलेल्या मोटारीही या पुरात बुडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोदाकाठालगतच्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी गंगापूर धरणात ३४ टक्के जलसाठा होता. शनिवारी पहाटे सहा वाजेपासून तर रविवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात १०६ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. दिवसभर झालेल्या पावसामुळे या जलसाठ्यात नक्कीच वाढ झाली असून, सोमवारी (दि.११) सकाळी निश्चित वाढ समजणार असल्याची माहिती गंगापूर धरणावरील शाखा अभियंता प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव तालुका वगळता अन्य सर्व भागांमध्ये पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.दुपारपर्यंत गोदाकाठावरील आठ दुचाकी, तीन चारचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच दोन नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. (प्रतिनिधी)