Nashik: अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:36 IST2025-05-09T16:35:19+5:302025-05-09T16:36:15+5:30
Nashik: दोघा अल्पवयीन मुलांना हाताशी धरून संशयित आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. गोवर्धन) हा सोनसाखळी चोरी करायचा.

Nashik: अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त
Nashik Crime: शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांकडून संशयितांचा शोध घेत मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश करत एकास बेड्या ठोकल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघा अल्पवयीन मुलांना हाताशी धरून संशयित आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. गोवर्धन) हा सोनसाखळी चोरी करायचा. त्याच्या ताब्यातून ३ लाख ९५ हजार ७०० रूपये किमतीचे सोने त्रिमूर्ती चौकातील सराफा व्यावसायिक संशयित विलास प्रमोद विसपुते यास विक्री केले होते.
या गुन्ह्यात अटक करून सोने हस्तगत केले आहे. त्या गंगापूर पोलिसांनी महिनाभरात दुसऱ्यांदा चेन स्नॅचिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांना गुंगारा देऊन झाला होता फरार
अंड्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यासोबत १७ वर्षाचा विधिसंघर्षित बालकावरदेखील यापूर्वीही जबरी चोरीचे दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी (४ मे) फिर्यादी रोहिणी पाटील या दुचाकीने गंगापूर रोडवरून प्रवास करत होत्या. यावेळी दोघांनी त्यांच्या पाठीमागून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली होती.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगापूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले होते.
असे अडकले पोलिसांच्या सापळ्यात
गोपनीय माहितीच्या आधारे गंगापूर परिसरात सापळा रचला. यावेळी तेथे हे तिघे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली त्यांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. शहरातील सात व पिंपरी चिंचवड येथील दोन असे नऊ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गंगापूर पोलिसांना यश आले.