अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर; बडे बडे नेते, सेलिब्रिटी दरबारात लावायचे हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:44 IST2026-03-20T10:37:14+5:302026-03-20T10:44:44+5:30
Nashik Ashok Kharat Viral Video : नाशिक येथील अशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पुरावे सापडले आहेत.

अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर; बडे बडे नेते, सेलिब्रिटी दरबारात लावायचे हजेरी
Nashik Ashok Kharat Viral Video : नाशिक येथील अशोक खरात याला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोलिसांना आता पुरावे सापडले आहेत, तसेच काही आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. न्यायालयाने अशोक खरात याला २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, काल पोलिसांनी खरात याच्या निवासस्थानासह त्याच्या फॉर्महाऊसची झाडाझडती पोलिसांनी घेतली. यावेळी पोलिसांना एक पिस्तूल सापडले तर आणखी काही पुरावे सापडले असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी आतापर्यंत अशोक खरात याचे ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे.या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अशोक खरात याच्याकडे अनेक बडे नेते यांच्यासह बडे सेलिब्रिटीही भविष्य पाहण्यासाठी येत होते.
अशोक खरात याने फक्त एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला नसून अनेक महिलांवर अत्याचार केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खरात त्याच्या केबीनमध्येच महिलांवर अत्याचार करत होता, आधी त्या महिलांना गुंगीचे औषध देऊन नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. याबाबत अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी मार्फत सुरू असून या एसआयटीचे प्रमुख तेजस्वी सातपुते आहेत.
तांत्रिक पुराव्याचा शोध सुरू
पोलिसांनी आधी अशोक खरात याच्या निवासस्थानासह ऑफिस, फार्म हाऊसची झाडाझडती घेतली. आता एसआयटीने तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू केली असून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपास करण्यात येत आहे. अशोक खरात याच्या अनेक ठिकाणी मालमत्ता सापडल्या आहेत, त्याने पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.