नाशिक: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:06 IST2025-07-17T16:05:51+5:302025-07-17T16:06:33+5:30

NEET Student Suicide News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एक १६ वर्षाची तरुणी नाशिकमध्ये शिकत होती. नीट परीक्षेची तयार करत होती. 

Nashik: Ahilyanagar student preparing for NEET exam ends her life in hostel | नाशिक: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं आयुष्य

नाशिक: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं आयुष्य

Crime news Nashik: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. ही विद्यार्थीनी मूळच अहिल्यानगर जिल्ह्यातील होती. ती नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी नाशिकमध्ये राहत होती. एका खासगी हॉस्टेलमध्ये राहून ती परीक्षेचा अभ्यास करत होती. पण, बुधवारी अचानक तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मूळ अहिल्यानगरची रहिवासी असलेली विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर (वय १६, रा. गौरव पार्क, कॅनडा कॉर्नर) हिने खासगी वसतिगृहाच्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शरणपूर येथील तिबेटियन मार्केटजवळ गौरव पार्क नावाची इमारत आहे. येथे फ्लॅटमध्ये मुलींसाठी असलेल्या वसतीगृहात ज्ञानेश्वरी राहत होती. 

ओढणीने पंख्याला घेतला गळफास

बुधवारी (दि.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिने ज्ञानेश्वरी हिने ओढणीद्वारे पंख्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

ही बाब लक्षात येताच अन्य विद्यार्थिनी व होस्टेल मालकाच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. 

तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे.

'नीट'ची करत होती तयारी

मागील दोन महिन्यांपासून ज्ञानेश्वरी या ठिकाणी राहत होती. तीने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच ती अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.

Web Title: Nashik: Ahilyanagar student preparing for NEET exam ends her life in hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.