नानासाहेब पाटील : परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

By Admin | Updated: August 21, 2014 00:14 IST2014-08-20T22:56:21+5:302014-08-21T00:14:39+5:30

लासलगाव बाजार समितीत टमाटा लिलावाचा शुभारंभ

Nanasaheb Patil: An attempt to increase the number of traders | नानासाहेब पाटील : परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

नानासाहेब पाटील : परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

लासलगाव : टमाटा उत्पादकांना स्पर्धात्मक वातावरणातून चांगला भाव मिळावा याकरिता लासलगाव येथील टमाटा लिलावातील परप्रांतीय नामवंत व्यापाऱ्यांची संख्या वाढविणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
बाजार समितीतील टमाटा लिलावाचा शुभारंभ नानासाहेब पाटील यांच्या हस्ते तसेच भाजीपाला मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच प्रकाश गांगुर्डे, टमाटा व्यापारी सचिन परदेशी व विष्णू सरोदे यांच्या हस्ते टमाटा क्रेटस्चे पूजन करून केल्यानंतर पिंपळगाव नजीक येथील लहानू सुधाकर भोर यांच्या टमाट्याला ६३० रुपये प्रतिक्रेट्स भाव जाहीर होऊन लिलावास सुरुवात झाली.
लवकरच लासलगाव येथील मुख्य आवारावर डाळींब व बेदाणा या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी टमाटा लिलावानंतर शेतकऱ्यांना लागलीच टमाटा विक्रीचे पैसे देण्यात येणार आहे, असे सांगितले. व्यापाऱ्यांनी परवान्याकरिता तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केले.
याप्रसंगी टमाटा व्यापारी बाळासाहेब शेजवळ, हारून शेख, अनिल शेजवळ, शरद हिरे, भगवान सरोदे, प्रभारी हिरालाल सोनारे, सहायक सचिव सुदीन टर्ले, लेखापाल नरेंद्र वाढवणे, सुनील डचके, राजेंद्र पाटील, सुरेश विखे, अशोक गायकवाड, सुशील वाढवणे यांच्यासह परिसरातील टमाटा उत्पादक उपस्थित होते. पहिल्याच दिवशी १११६ क्रेट्समधील टमाट्याला १५१ ते ७०१ रुपये भाव मिळाला. (वार्ताहर)

Web Title: Nanasaheb Patil: An attempt to increase the number of traders