शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नाना-काका हात जोडतो, एकोेपा ठेवा

By admin | Updated: July 16, 2017 00:04 IST

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व अजित पवार यांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांना कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रवादी मेळावा : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व अजित पवार यांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांना कानपिचक्या देतानाच कारभार सुधारण्याचा इशारा दिला. दोन महिन्यांनंतर पुन्हा येऊन आढावा घेऊ, असा इशारा देतानाच पक्षांतर्गत खांदेपालटाचे सूतोवाचही केले.  गजानन शेलार यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीचा मुद्दा मांडला. तोच धागा पकडून प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे म्हणाले, पक्षात कोण आले, कोण गेले? याची तमा बाळगण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे होता. कारण अजितदादा येणार म्हटल्यावर असे चार हॉल सहज भरले असते. विद्यार्थी व युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या वयानुसारच झाली पाहिजे. वृत्तपत्रात आपल्याच पक्षातून विरोधात बातमी पसरविली जात असल्याचा आरोप रवींद्र पगार यांनी केला. त्यावर तटकरे म्हणाले, तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात. तुम्हीच असे अस्थिर झाले तर कार्यकर्ते सैरभैर व्हायला वेळ लागणार नाही. दिलीप बनकरांना उद्देशून ‘काका, तुम्हाला हात जोडतो, आता तरी एकाच दिशेने पक्षाची वाटचाल सुरू करा’, असा मार्मिक टोला सुनील तटकरे यांनी मारला. कसे म्हणता ‘आगे बढो’...अजित पवारांनीही आपल्या भाषणातून पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यांचे भाषण सुरू असताना ‘आगे बढो’ची घोषणा झाली. त्याचवेळी काय चार आमदार निवडून येतात अन् आगे बढो म्हणता, असे म्हणताच सर्वत्र हशा पिकला. पक्षांतर्गत असलेले समज-गैरसमज दूर झाले पाहिजे. अमुकचा फोटो लावला नाही, तर तमुकाचे समर्थक नाराज. एक दोन फोटो लावायला तुम्हाला खर्च पडतो काय? आम्ही ४५ दिवसांत राज्य फिरलो, तुम्ही दोन महिन्यांत सर्व नियुक्त्या करा. पक्षांतर्गत बंडाळीला वेळीच आवर घातला पाहिजे, नाही तर त्याचा फटका पक्षाला बसतो. उमेदवारी देताना आणि नियुक्ती देताना कोणताही आकस ठेवता कामा नये. नाही तर वॉर्डात आणि गावात निवडून न येणारे पदे मिरवतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आपण अजित पवार गट स्थापन करायला आलेलो नाही, असे त्यांनी सांगितले. रवींद्र पगार यांना उद्देशून तुम्हाला हॉल मिळत नव्हता तर मला सांगायचे, मी हॉल मिळविला असता, असेही पवार यांनी सुनावले.