शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी, नोटा हे सर्व भाजपालाच माहीत

By admin | Updated: February 7, 2017 00:08 IST

देसाई : शिवसेनेत गटबाजी नसल्याचा दावा

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात तिकीट विक्री झाल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यावर शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी नोटा, नोटाबंदी हे त्यांचेच विषय असल्याचा टोला लगावला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये जमा केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याची टिप्पणी करणाराही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाशिकमध्ये आलेल्या देसाई यांनी भाजपाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या विषयावर टिप्पणी करताना त्यांनी नोटा हा भाजपाचाच विषय असल्याचे सांगितले. सध्या भाजपाला खूप काही काही सुचते आहे, राम, कृष्ण आणि महाभारत असे अनेक विषय असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी भाजपा सरकारने दबाव टाकून शिवसेनेचे अर्ज बाद केल्याच्या विषयावर बोलताना त्यांनी सरकार असले की असे केले जाते तसेच अन्य घटक प्रभावी असतात, असे नमूद केले, मात्र नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्यामागे भाजपाचे दबावतंत्र आहे, असे वाटत नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेत एबी फॉर्मचा घोळ हा गटबाजीतून झाल्याच्या तक्रारींविषयी त्यांनी इन्कार केला. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेकडे सर्वाधिक इच्छुक होते, त्यातून तांत्रिक दोष निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उमेदवारी वाटपावरून माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण केली होती. त्यावरही देसाई यांनी सारवासारव केली. सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेत गटबाजी नाही, तर सर्व गट मिळून महापालिका निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, अ‍ॅड. शिवाजी सहाणे आदि उपस्थित होते. मात्र महानगरप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)