शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद; ग्रामस्थांत नाराजी

By admin | Updated: March 18, 2017 23:20 IST

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, तातडीने सदर योजनेतून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील जनता उपोषण करेल, असा इशारा माजी आमदार संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.या संदर्भात तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांची संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपा अध्यक्ष दत्तराज छाजेड, माजी जि.प. सदस्य राजाभाऊ पवार, संजय आहेर, सरपंच अशोक पवार, जि.प. सदस्य आशाबाई जगताप, साहेबराव नाईकवाडे, मधुबाला खिरडकर व पाणीग्रस्त गावातील ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नागापूर, पांझणदेव, पानेवाडी, धोटाणे, ज्वार्डी अशा तालुक्यातील २६ गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सदर योजनेचे काम सुरू असून, ठेकेदाराला अदा करण्यात यावयाच्या देयकांवरून वाद आहेत. काही महिने पाणीपुरवठा केल्यानंतर अचानक तो बंद करण्यात आला.योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावे आवश्यक पाणी वर्गणी देण्यास तयार आहेत. मनसुख मोरे, मोतीराम कातकाडे, सुनीला काळे, चित्राबाई पगारे, शंकर गुंडगळ, आशाबाई काकड, सुरेश बेदाडे, रेखा उगले, बाळू धिवर, मीराबाई पवार, सखूबाई सोनावणे, अलका कुणगर, आशाबाई कदम, हिरामण व्हडगळ, त्र्यंबक करवर, अरुणाबाई माकुने, बाबा शेरमाळे, सुनीता वाघ, सत्यभामा काकळीज, लता नाईकवाडे, संदीप आहेर आदि ग्रामपचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)