नाशिकमध्ये सऱ्हास जाळला जातोय कचरा ; प्रदुषणात भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 02:52 PM2019-01-15T14:52:57+5:302019-01-15T14:55:59+5:30

नाशिक : कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुगंर्धी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळत असल्याने अशाप्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा अद्यापही अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याने शहरातीलविविध भागातील नागरिकांकडून सऱ्हासपणे रस्त्याच्या कडेला तसेच खुल्या मैदानांवरील कचरा जाळून नष्ट करण्या प्रकार सुरु आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणातही भर पडत आहे.

naasaikamadhayae-sarahaasa-jaalalaa-jaataoya-kacaraa-paradausanaata-bhara | नाशिकमध्ये सऱ्हास जाळला जातोय कचरा ; प्रदुषणात भर 

नाशिकमध्ये सऱ्हास जाळला जातोय कचरा ; प्रदुषणात भर 

Next
ठळक मुद्देशहरात सऱ्हास कचरा जाळण्याचे प्रकारजाळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे प्रदूषणात भर

नाशिक : कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुगंर्धी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळत असल्याने अशाप्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा अद्यापही अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याने शहरातीलविविध भागातील नागरिकांकडून सऱ्हासपणे रस्त्याच्या कडेला तसेच खुल्या मैदानांवरील कचरा जाळून नष्ट करण्या प्रकार सुरु आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणातही भर पडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
शहरात कचऱ्यासह पालापाचोळा, प्लास्टिक, रबर जाळताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्यासंबंधीचा निर्णय महानगर पालिकेकडून घेण्यात आलेला आहे. तसेच सर्व प्रकारचा मोठ्या प्रमाणात कचरा जाळताना आढळल्यास २५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दहा हजार रुपये, रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दिडेश रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास दोनशे तर, शौच करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय महानगर पालिकेने २०१८ मध्येत घेतला आहे. परंतु या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने शहारत सऱ्हासपणे कचरा जाळून नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत.त्याचप्रमाणे घर, इमारत, वस्तीच्या परिसरात असलल्या शासकीय व खासगी खुल्या मैदानांवर वाढलेले गवतही परिसरातील नागरिकांकडून जाळले जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत असून महानगर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा मा याक डे काना डोळा होताना दिसून येत आहे. 

Web Title: naasaikamadhayae-sarahaasa-jaalalaa-jaataoya-kacaraa-paradausanaata-bhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.