शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरातील आखाड्यांना नगरपरिषदेच्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:38 IST

त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथील कुंभमेळ्यातून परतणाऱ्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आश्रमात प्रवेश करावा, अशी नोटीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने येथील प्रत्येक आखाड्यांच्या साधूमहंतांना बजावली आहे. दरम्यान, हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा झाल्याने त्र्यंबकेश्वरमधील अनेक आखाड्यांचे साधू परतीच्या मार्गाला लागले आहेत.

ठळक मुद्देकुंभमेळ्यातून परतणाऱ्यांना कोविड चाचणी आवश्यक

त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथील कुंभमेळ्यातून परतणाऱ्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आश्रमात प्रवेश करावा, अशी नोटीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने येथील प्रत्येक आखाड्यांच्या साधूमहंतांना बजावली आहे. दरम्यान, हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा झाल्याने त्र्यंबकेश्वरमधील अनेक आखाड्यांचे साधू परतीच्या मार्गाला लागले आहेत.हरिद्वारच्या कुंभमेळ्यात भारतातील तेरा आखाड्यांचे साधुमहंत मिळून जवळपास १५ हजार साधू सहभागी झाले होते. तर सुमारे ५० लाख भाविकांनी स्नान केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अनेक साधुमहंतांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. आतापर्यंत तीन शाहीस्नाने पार पडली आहेत, तर साधुमहंतांना कोरोनाची बाधा झाल्याचे पाहून निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे साधू आपापल्या गावी परतत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात सहभागी होऊन परतणाऱ्या साधुमहंतांसंदर्भात त्र्यंबक नगरपरिषदेमार्फत प्रत्येक आखाड्यांच्या साधुमहंतांना नोटीस बजावण्यात आली आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आपापल्या आश्रमात प्रवेश करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र कुंभमेळ्याचे ठिकाण असून नाशिकला तीन वैष्णव तथा बैरागी आखाडे आहेत. तर त्र्यंबकेश्वरला दहा आखाडे व नाथ संप्रदायाचा श्री गोरक्षनाथ मठ आहे. सात आखाडे नागा संन्यासींचे तर दोन आखाडे उदासीन व एक निर्मल आखाडा आहे. दरम्यान अजून चौथी पर्वणी बाकी असून दोन उदासीन व निर्मल आखाड्याचे साधू चौथ्या पर्वणीला शाहीस्नान करतात.आम्ही कोविडमुक्तत्र्यंबकेश्वर येथील अ.भा. आखाडा परिषदेचे पदाधिकारी व श्री पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत शंकरानंद सरस्वती यांच्याशी संपर्क साधला असता तेदेखील त्र्यंबकेश्वरकडे यावयास निघाले आहेत. आपण कोविडमुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरcorona virusकोरोना वायरस बातम्या