मलब्याच्या पुनर्वापरासाठी मनपाला दोन निविदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:12 PM2020-08-22T22:12:34+5:302020-08-23T00:20:05+5:30

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेअंर्तगत नाशिक महापालिकेला टॉप फाइव्हमधील क्रमांक हुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकामाचे निरूपयोगी साहित्य म्हणजेच सिमेंटच्या मलब्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.

Municipal Corporation receives two tenders for recycling of debris | मलब्याच्या पुनर्वापरासाठी मनपाला दोन निविदा प्राप्त

मलब्याच्या पुनर्वापरासाठी मनपाला दोन निविदा प्राप्त

Next
ठळक मुद्देस्वच्छ शहर सर्वेक्षण । टॉप फाइव्हसाठी मोर्चेबांधणी सुरू

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेअंर्तगत नाशिक महापालिकेला टॉप फाइव्हमधील क्रमांक हुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकामाचे निरूपयोगी साहित्य म्हणजेच सिमेंटच्या मलब्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेला शासनाकडून साडेसात कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष बांधकामांचे निरूपयोगी सिमेंट-वाळूच्या साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या पुनर्वापराचा कोणताही प्रकल्प नाही. महापालिकेच्या वतीने खड्डे किंवा खाणी बुजवण्यासाठी लॅँड फिल म्हणून या निरूपयोगी साहित्याचा वापर केला जातो. महापालिकेने या अगोदरच निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्यात केंद्र आणि राज्य शासनाने बदल केले. अशा प्रकारच्या साहित्याचा पुनर्वापर (रिसायकल) करणारा प्रकल्प उभारल्यास साडेसात कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते, असे नव्या आदेशात नमूद केले आहे. ई-कचऱ्यासाठी निविदानाशिक शहरात आता ई-कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीदेखील महापालिका निविदा मागविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सहाही विभागात मोबाइल, बॅटरी, संगणक आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जमविण्यासाठी कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असून, तेथून हा ई-कचरा ठेकेदार पुनर्वापर करण्यासाठी नेईल. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने अशाप्रकारचा प्रकल्प साकारण्यामुळे स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकला अधिक गुण मिळणार आहेत. शिवाय अनेक ठिकाणी खुल्या भूखंडावर किंवा पडीक प्लॉटवर अशा प्रकारे साहित्य फेकण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.

Web Title: Municipal Corporation receives two tenders for recycling of debris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.