महापालिकेचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

By Admin | Updated: September 29, 2016 00:49 IST2016-09-29T00:48:32+5:302016-09-29T00:49:51+5:30

नाशिकरोड विभागीय कार्यालयातील प्रकार

The municipal clerk caught the bribe | महापालिकेचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

महापालिकेचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

नाशिक : भाडेतत्त्वावर दिलेल्या फ्लॅटमधील मिळकतदार कॉलममध्ये समाविष्ट झालेले नाव कमी करणे तसेच वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेणारा महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय चिंतामण पवार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़ २८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़
तक्रारदार यांच्या बहिणीचा जेलरोड येथे फ्लॅट असून तो त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेला होता. त्यामुळे महापालिकेने फ्लॅटच्या मिळकतीमध्ये भाडेकरूचे नाव घरपट्टीमध्ये नमूद केले व वाढीव दराने घरपट्टी आकारली होती़ एप्रिल २०१२ पासून तक्रारदाराच्या बहिणीने भाडेकरूस काढून देऊन त्या स्वत: राहत होत्या़ या फ्लॅटवरील भाडेकरूचे नाव व वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठी तक्रारदाराने १० फेब्रुवारी २०१६ रोजी नाशिकरोड विभागीय कार्यालयात अर्ज केला होता़ या कामासाठी घरपट्टी विभागातील कनिष्ठ लिपिक संजय चिंतामण पवार याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: The municipal clerk caught the bribe