शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाक्यावर जल्लोष; सत्ता मिळाल्याचा आनंद

By admin | Updated: March 14, 2017 17:02 IST

वसंत गिते यांच्या सत्तेतील सहभागामुळे नेहमीच राजकीय गर्दीने फुलून जाणारा परंतु गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय विजनवास सोसणाऱ्या मुंबई नाक्यावर मंगळवारी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली.

इंदिरानगर : वसंत गिते यांच्या सत्तेतील सहभागामुळे नेहमीच राजकीय गर्दीने फुलून जाणारा परंतु गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय विजनवास सोसणाऱ्या मुंबई नाक्यावर मंगळवारी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. गिते यांचे पुत्र प्रथमेश याची नाशिकच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने मुंबई नाक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. वसंत गिते यांच्या राजकीय कारकिर्दीला मुंबई नाका कायमच साक्षीदार राहिला असून, नगरसेवकपदी त्यांची झालेली निवड असो की, शहराचे प्रथम महापौरपद त्यांनी भूषविले असो, मुंबई नाक्यावर कार्यकर्त्यांचा राबता कायमच राहिला. शहरातील राजकारणाचे व सत्तेचे अनेक निर्णय, गुप्त खलबते याच मुंबई नाक्यावर शिजले. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गिते आमदार झाल्याने तर मुंबई नाका हा राजकारणाचा केंद्रबिंदू बनून राहिला, त्यातच २०१२ च्या नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेच्या घोडदौडीला मुंबई नाक्यावरूनच पाठबळ मिळाले व महापालिकेची सत्ता ताब्यात आल्यानंतर मुंबई नाक्यावर मनसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. महापौरपद असो वा स्थायी समितीचे सभापती असो या पदांचा फैसला याच ठिकाणाहून होत असताना, राजकारणाचे फासे उलटे पडले. गिते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, त्यांनी मनसेची साथ सोडली, परिणामी त्यांचे राजकीय अस्तित्वही गेली अडीच ते तीन वर्षे जवळ जवळ संपुष्टात आले. नाईलाजास्तव भाजपात त्यांनी प्रवेश केल्याने पुन्हा मुंबई नाक्याच्या राजकीय केंद्रावर शिक्कामोर्तब झाले. त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दोन दिवसांपासूनच बळावल्याने मुंबई नाक्यावर त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली.