शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे धरण पाणीपुरवठा निविदा प्रक्रियेत घोटाळा

By admin | Updated: February 27, 2015 23:38 IST

अटी-शर्तींमध्ये बदल : विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, अधिकाऱ्यांकडून आयुक्तांचीही फसवणूक

नाशिक : मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेत विशिष्ट मक्तेदाराला लाभ व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक मुद्दे आणि अटी-शर्तींमध्ये बदल केल्याने महापालिकेचे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान होणार असून, निविदा प्रक्रियेतील बदलांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांनाही अंधारात ठेवत त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केला आहे. बडगुजर यांनी या पत्रासोबत माहितीच्या अधिकारातून मिळविलेली काही महत्त्वाचे दस्तावेजही आयुक्तांकडे पुराव्यादाखल सुपूर्द केले आहेत. नाशिक शहराची २०४६ सालची लोकसंख्या विचारात घेऊन मुकणे धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना महापालिकेने आखलेली आहे. सदर योजनेसाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होणार आहे. सदर योजनेची निविदा प्रक्रिया राबविताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वीही विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला होता. आता त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवित पाणीपुरवठा विभागाने निविदा प्रक्रियेत अटी-शर्तींमध्ये बदल करत केलेला पराक्रमच आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. बडगुजर यांनी म्हटले आहे, विशिष्ट मक्तेदाराच्या आर्थिक हितासाठी व आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठा विभागाने निविदा प्रक्रियेच्या अटी-शर्तींमध्ये बदल केलेला आहे. पाणीपुरवठा विभागाने पाच मक्तेदार २८ एप्रिल २०१४ रोजी पात्र ठरविले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०१४ रोजी अटी-शर्तींमध्ये बदल केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने पाइप कंपनीचा सात वर्षांची सरासरी उलाढाल १०० कोटीऐवजी ५० कोटी दाखविला आहे. मक्तेदाराचे नेट वर्थ १० कोटीऐवजी ५ कोटी केलेले आहे. बॅँक सॉलव्हन्सी ३३ कोटी मागितली होती ती १५ कोटी करण्यात आली आहे. पाइपची जाडी १८ एमएम होती त्याऐवजी ती १६ एमएम करून मक्तेदाराचा ११ कोटी ५० लाखांचा फायदा करून देत मनपाचे नुकसान केलेले आहे. पाइप पुरवठ्याबाबतही अनुभव कोणत्याही खात्याचा गृहित धरण्यात आला आहे. पाइप उत्पादकाकडे आयएसओ सर्टीफिकेट असणे आवश्यक होते. ही अटच काढून टाकण्यात आली आहे. पाइप उभारणी क्षमता ५०० मीटर होती त्याऐवजी १०० मीटर करण्यात आली आहे. पाइप कोटिंग कॉपर स्लॅग ब्लॉस्ंिटग करणे आवश्यक होते त्याऐवजी शॉर्ट ब्लास्ंिटग मंजूर केले. निविदा बयाणा रक्कम १ टक्का होती त्याऐवजी बॅँक गॅरंटी दिली तरी चालेल यासह काही अटी-शर्तींमध्ये बदल करत तसेच मक्तेदारास मुदतवाढ देऊन ई-निविदा प्रक्रियेचाही भंग केला असल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)