शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 8:39 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : आघाडी सरकारमुळे उंचावल्या अपेक्षा

किकवी प्रकल्प सन २००६-०७ सालापासून चर्चेत आहे. १,८०० दसलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे नाशिक महानगरातील भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे, शिवाय गोदावरीच्या पूररेषेला या धरणाचा पर्याय आहे. साधारण एक हजार कोटीच्या आसपास या धरणासाठी खर्च येणार आहे. नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून नेहमीच दावा केला जातो. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांची निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेऊन किकवी धरण बांधण्यासाठी सन २००७ मध्ये केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मान्यता मिळविली होती. त्यावेळी २०२१ पासून नाशिक शहराला पाणी देण्याचे निश्चित झाले होते, परंतु प्रकल्पाचा खर्च महापालिकेने करण्याची तयारी दर्शविली नाही. त्याच दरम्यान, कथित सिंचन घोटाळा चर्चेत आला आणि तत्कालीन भाजप सरकारने किकवी प्रकल्प गुंडाळला. आता महाराष्ट्रात आघाडी सरकारची सत्ता असल्याने हा प्रकल्प पुनश्च ऊर्जितावस्थेत आणावा, यासाठी जलचिंतन समितीतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना किकवी प्रकल्प सुरू करण्याचे साकडे घालण्यात आले. त्यानुसार, शासनस्तरावर पुन्हा एकदा किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाली आहे.वनविभागाची अडचण दूरकिकवी धरणात ब्राह्मणवाडे पिंपळद पिंप्री आदी गावांच्या जमिनी थोड्या असल्या, तरी वनविभागाचे क्षेत्र जास्त आहे, परंतु वनविभागाची अडचणही दूर झाल्याचे समजते. शिरसगावजवळील जव्हार रस्ता पाण्यात जाणार असला, तरी तो दूरवरून काढता येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात