शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन

By admin | Updated: August 19, 2016 00:22 IST

निषेध : बागलाण तालुक्यातील आदिवासी संघटना एकवटल्या; तहसीलदारांना निवेदन

सटाणा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी बोलावल्या आढावा बैठकीस विविध खातेप्रमुखांनी पाठ फिरविल्याच्या निषेधार्थ संजय चव्हाण यांनी बागलाण तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकल्याच्या प्रकाराला गुरुवारी वेगळे वळण मिळाले. गटविकास अधिकारी आदिवासी समाजाचा असल्यामुळेच त्यांच्यावर हा अन्यायकारक प्रकार केल्याचा निषेध करत सुमारे तीनशे ते साडेतीनशे आदिवासींनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून अन्याय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.संजय चव्हाण यांच्यासह पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार बच्छाव, संजय सोनवणे, वैभव गांगुर्डे, राकेश सोनवणे, लखन जाधव आदि कार्यकर्त्यांनी बागलाणचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. आमदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी संजय बागडे यांनी विविध खातेप्रमुखांची आढावा बैठक बोलावली होती. बहुतांश खातेप्रमुखांनी या आढावा बैठकीकडे पाठ फिरविल्याने संजय चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला होता. दरम्यान, मंगळवारी झालेल्या या प्रकाराला गुरुवारी वेगळेच वळण मिळाले. आज दुपारी अचानक तालुक्यातील आदिवासींच्या विविध संघटनांच्या तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्त्यांचा जमाव थेट तहसील कार्यालयावर चाल करून गेला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी आदिवासींवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करून बागलाणचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम हे आदिवासी समाजाचे असल्यामुळेच त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून त्यांना हीन वागणूक दिली गेल्याचा निषेध व्यक्त केला. टाळे लावून अशा पद्धतीने आदिवासी अधिकाऱ्यावर अन्याय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा संपूर्ण आदिवासी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिला. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती जिजाबाई सोनवणे, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, भाजपा आदिवासी आघाडीचे कन्हू गायकवाड, भटू महाले, राजेंद्र गांगुर्डे, पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, परशुराम सोनवणे, त्र्यंबक बापू सोनवणे, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार, रामदास सोनवणे, एकनाथ सोनवणे, अण्णा मोरे, राम सोनवणे, बापू अहिरे, भास्कर गांगुर्डे, जयवंतीबाई चौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट गवळी, दादाजी माळी, पंडित दळवी आदि उपस्थित होते.