नाशिकच्या गिर्यारोहकांनी केला ब्रम्हा खुटा सुळका सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:27+5:302021-02-05T05:42:27+5:30

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या त्र्यंबकेश्वर रांगेत हरिहर आणि त्र्यंबकगड यांमध्ये ब्रह्मा पर्वत आहे. ब्रह्माच्या पूर्व भागातील मधल्या टप्प्यावर खुटा नामक ...

The mountaineers of Nashik made Brahma Khuta Sulka Sir | नाशिकच्या गिर्यारोहकांनी केला ब्रम्हा खुटा सुळका सर

नाशिकच्या गिर्यारोहकांनी केला ब्रम्हा खुटा सुळका सर

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या त्र्यंबकेश्वर रांगेत हरिहर आणि त्र्यंबकगड यांमध्ये ब्रह्मा पर्वत आहे. ब्रह्माच्या पूर्व भागातील मधल्या टप्प्यावर खुटा नामक सुळका आहे. सुळक्याची विविध मार्गांची उंची ८५ ते १७० फूट असून गिर्यारोहणाच्या श्रेणीनुसार या सुळक्याचे आरोहण मध्यम ते कठीण प्रकारात मोडते. विशेष म्हणजे ह्या सुळक्याची गिर्यारोहणाच्या यादीमध्येही नोंद नाही. आजपर्यंत हा सुळका गिर्यारोहकांकडून आणि स्थानिकांकडून आरोहित झालेला नव्हता. अस्पर्शित ब्रह्मा खुटा सुळका वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांनी दोर लावून यशस्वीरित्या सर करत त्यावर पहिले पाऊल ठेवले. ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

वैनतेय संस्थेचे गौरव जाधव (प्रथम आरोहक), सागर पाडेकर, रोहित हिवाळे यांच्यासह अपूर्व गायकवाड, निनाद देसले, तेजस देसाई, अमित भामरे, विद्या आहिरे या गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. वैनतेयचे विश्वस्त सुदर्शन कुलथे, भाऊसाहेब कानमहाले, आशिष शिंपी, मनोज बैरागी यांच्यासह नाशिकमधील पहिल्या महिला आरोहक सुषमा मिशाळ-मराठे यांचे या मोहिमेला मार्गदर्शन लाभले.

छायाचित्र आर फोटोेवर २७ वैनतेय नावाने सेव्ह.

Web Title: The mountaineers of Nashik made Brahma Khuta Sulka Sir