शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रासाठी आईचा मृतदेह कारमधून नेला रुग्णालयापर्यंत, नाशिक पालिकेकडून शववाहिका मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 05:06 IST

Nashik : आडगाव नाका परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील वृद्धा गेल्या तीन दिवसांपासून बाधित असल्याने, तिच्या उपचारासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती.

नाशिक : पंचवटीतील एका वृद्धेला कोरोना संसर्ग झाला. तीन दिवस महापालिका व खासगी रुग्णालयात शोधाशोध करूनही बेड मिळाला नाही. त्यात संसर्ग वाढत गेला व त्या वृद्धेचा मृत्यू झाला, परंतु दुर्दैव येथेच संपले नाही, अंत्यसंस्काराला नेेण्यास पालिकेची एक शववाहिका किंवा रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. नगरसेविकांच्या मध्यस्थीने नोडल ऑफिसरने प्रमाणपत्र देण्याची तयारी केली, परंतु तेथे प्रत्यक्ष मृतदेह आणण्यास सांगण्यात आल्याने, संबंधित मृत वृद्धेच्या मुलीने कारमध्ये मृतदेह ठेवून तो मेरीपर्यंत नेला व त्यानंतर तेथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर, त्या वृद्धेचा अमरधामकडे अखेरचा प्रवास सुरू झाला. आडगाव नाका परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील वृद्धा गेल्या तीन दिवसांपासून बाधित असल्याने, तिच्या उपचारासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती. तीन दिवस पाठपुरावा करूनही कोठेही बेड मिळाला नाही. अखेर घरीच त्या वृद्धेचा अंत झाला. 

-  मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे ठरविल्यानंतर शववाहिका उपलब्ध होईना. त्यामुळे संबंधितांनी परिसरातील नगरसेविका प्रियांका माने यांच्याशी संपर्क साधला. त्या आणि त्यांचे पती धनंजय माने यांनी महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात सकाळपासून अनेकदा संपर्क साधला. मात्र, शववाहिका तर उपलब्ध नाहीच, परंतु रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हती. एका रुग्णवाहिका चालकाशी माने यांचा संपर्क झाला, परंतु गाडी येत असताना रस्त्यातच ती फेल झाली.  - मृतदेह अमरधाममध्ये नेल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला तपासला जातो, परंतु येथे तर दाखला मिळण्याचीही अडचण! अखेरीस महापालिकेच्या मेरी येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांशी माने यांनी संपर्क साधला आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली. -  मात्र, कोविड झाल्याचे पुरावे आणि मृतदेह बघून प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले. त्यानुसार, मृतदेह मेरी येथील कोविड सेंटरमध्ये नेण्याचे ठरले, परंतु पुन्हा रुग्णवाहिकेचा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस त्या वृद्धेच्या मुलीने मोटारीत मृतदेह ठेवला आणि तो मेरीपर्यंत नेला. तेथे डॉक्टरांनी सर्व तपासून मृत्यूचा दाखला दिला आणि रुग्णवाहिकाही दिली. 

टॅग्स :Nashikनाशिक