शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर पैसे; नंतर निकाल !

By admin | Updated: April 30, 2017 01:59 IST

नाशिक : वार्षिक शैक्षणिक शुल्कापैकी काही रक्कम शिल्लक राहिल्यास खासगी शाळाचालकांकडून मुलांसह पालकांना निकाल देण्यासही नकार दिला जात आहे

 नाशिक : वार्षिक शैक्षणिक शुल्कापैकी काही रक्कम शिल्लक राहिल्यास शहरातील काही खासगी शाळाचालकांकडून सर्रासपणे मुलांसह पालकांना निकाल देण्यासही नकार दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याची संपूर्ण फी भरली जात नाही तोपर्यंत त्याला व त्याच्या पालकांना निकाल जाणून घेण्याचा जणू अधिकारच नसल्याचा अजब कारभार शहरात सुरू आहे.शहरातील उपनगरीय भागामध्ये असलेल्या मराठी, उर्दू, इंग्रजी, सेमी-इंग्रजी या माध्यमांच्या विनाअनुदानित खासगी शाळा चालविणाऱ्या संस्थांनी जणू मुलांना त्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घ्यायचा अधिकारच हिरावून घेतला आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे अर्धवट भरलेले शैक्षणिक शुल्क. बहुतांश मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या सधन कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांच्या तुलनेत गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. यामुळे अनेकदा मुलांच्या पाल्यांकडून निम्मे शुल्क शाळेमध्ये भरले जाते व उर्वरित रक्कम शिल्लक ठेवली जाते. दरम्यानच्या काळात अनेकदा शिक्षकांकडून मुलांद्वारे ‘चिठ्ठ्या’ पाठवून शुल्क मागणीचा तगादाही लावला जातो. काही अडीअडचणींमुळे पालकांकडून उर्वरित शुल्क भरण्यासाठी विलंब होतो आणि वार्षिक परीक्षाही उलटून निकालाचा दिवसही उजाडतो. यादिवशी मुले मोठ्या आशेने व उत्सुकतेने आपले निकालपत्रक घेण्यासाठी शाळेची वाट पालकांसोबत धरतात; मात्र शाळेत गेल्यानंतर ‘निकाल मिळणार नाही किंवा सांगितलाही जाणार नाही’ हे शब्द कानी पडतात आणि त्याचा थेट परिणाम बालमनावर होतो; मात्र याचे संस्थाचालकांसह त्या शिक्षकांनाही कुठलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. यामुळे मुलांसह पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तोंडी निकालही शिक्षकांकडून सांगणे टाळले जाते. त्यामुळे आपण उत्तीर्ण झालो की अनुत्तीर्ण झालो हे अनेकांना समजत नाही. याचवेळी काही मुले मात्र आनंदाने हातात निकालपत्रक घेऊन पालकांसोबत जात असल्याचे चित्रही त्यांच्या नजरेस पडते. (प्रतिनिधी)