पोलिसांकडील तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा महाविद्यालयात जाऊन विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:36 IST2018-09-05T17:34:29+5:302018-09-05T17:36:01+5:30

नाशिक : किरकोळ वादानंतर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी महाविद्यालयात जाऊन तरुणीचा हात धरून वर्गाबाहेर ओढत आणून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़३) दुपारी गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल आवारात घडली़ या प्रकरणी संशयित शुभम रमेश सांगळे (रा. राज रेसिडेन्सी, नरहरीनगर, पाथर्डी फाटा) यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, संशयित सांगळे याची न्यायालयाने नाशिकरोड कारागृहात रवानगी केली आहे.

 Molestation in the college's college to withdraw complaint against police | पोलिसांकडील तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा महाविद्यालयात जाऊन विनयभंग

पोलिसांकडील तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा महाविद्यालयात जाऊन विनयभंग

ठळक मुद्देतरुणीचा हात धरून वर्गाबाहेर ओढत आणून विनयभंग संशयित सांगळे याची नाशिकरोड कारागृहात रवानगी

नाशिक : किरकोळ वादानंतर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी महाविद्यालयात जाऊन तरुणीचा हात धरून वर्गाबाहेर ओढत आणून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़३) दुपारी गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल आवारात घडली़ या प्रकरणी संशयित शुभम रमेश सांगळे (रा. राज रेसिडेन्सी, नरहरीनगर, पाथर्डी फाटा) यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, संशयित सांगळे याची न्यायालयाने नाशिकरोड कारागृहात रवानगी केली आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी व संशयित हे दोघे परिचित असून, त्यांचा कौटुंबिक वाद आहे़ सोमवारी ही तरुणी भोसला मिलिटरी स्कूल येथील महाविद्यालयात गेली असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित सांगळे हा महाविद्यालयात गेला़ यानंतर वर्गामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून या तरुणीचा हात धरून तिला बळजबरीने वर्गाबाहेर ओढत आणून तिचा विनयभंग केला़ तसेच अश्लील शिवीगाळ करून, तुझ्या बापाने केस मागे घेतली नाही तर तुला जिवे ठार मारील अशी धमकीही दिली़

या प्रकरणी पीडित युवतीने गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़

Web Title:  Molestation in the college's college to withdraw complaint against police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.